जागतिक नदी दिनानिमित्त
उल्हास नदी बचाव तर्फे उल्हासनदीवरील दहिवली पुलावरील गणेश घाटावर स्वच्छता अभियान...
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
उल्हासनदीची अंबरनाथ, उल्हासनगर येथील दुरास्था आपण सर्वच जण पाहतो आहोत. शहरीकरणामुळे झालेले हे विद्रुपीकरण आपल्या नेरळ-कर्जत सारख्या निसर्गरम्य परिसरातही हळूहळू पसरत असून त्याला वेळीच आळा घातला पाहिजे अन्यथा येणा-या काळात आपल्या या नदीचीही अशीच दुरावस्था होण्याची भिती जाणवू लागली आहे. उल्हासनदीवर वाढणारी पर्यटकांची गर्दी, गणेश घाटावर रात्रीच्या वेळी दिसून येणारे मद्यपी आणि मद्यपान केल्यावर आढळणा-या काचेच्या बाटल्या याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. नदी स्वच्छ आणि निर्मळ राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे व जमेल तशी स्वच्छता केली पाहिजे.
या अभियानाचे प्रमुख केशव तरे यांनी काही दिवसापुर्वी ग्रामपंचाय प्रशासनास कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश घाटावर जमाव बंदी तसेच घाण न करण्याबाबत सुचना फलक लावण्याची मागणी केली होती त्यावर दहिवली ग्रामपंचायत ने त्वरीत कार्यवाही करत आज सुचना फलक लावले आहे. तसचे, याप्रसंगी नदी परिसर नेहमी स्वच्छ राखण्यासाठी पुढेही नेहमी स्वच्छता मोहीम राबविली जाईल.