कुठे तरी आमचा ही विचार करा : बहुरूपी यांची सरकारला हाक!
राम जळकोटे-तुळजापूर.
सध्या संपूर्ण जगभरात अनेक विषय चर्चेत आहेत. पण याचबरोबर महामारीच्या काळात गेली ६ महिने पासून हातांवर पोट असणाऱ्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. आपल्याकडे असलेली कला आणि त्यातून जनसामान्यांचे मनोरंजन करणारा बहुरूपी आता मोठ्या संकटात आला आहे. गावोगावी , शाळा, कार्यालये आणि घरदारांसमोर जाऊन आपल्याकडे असलेली मनोरंजनाची कला लोकांसमोर सादर करून मिळणारी बक्षीसे .
(१, २ रु आणि मूठ भर धान्य रुपात ) आता हे मनोरंजनांचे कार्यक्रम करून मिळणारी बक्षीस आता या कोरोनाच्या महामारीच्या काळात मिळणं अश्यक्य झालं आहे.
आपल्या अंगी असलेली कला आणि त्यातून मिळणारी बक्षिसे आता या बहुरूपीना मिळणं अवघड झालेलं आहे. ग्रामीण भागात चला बाई चला लग्नाला चला, ३२ तारखेला लग्नाला चला, यांसारख्या मनोरंजनाच्या खदखदून हसवणाऱ्या गोष्टीवर बहुरूपीना आता उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाच सावट आणि त्याचदरम्यान हातावर पोट असणाऱ्यावर आता संकट ओढवल आहे.
महाराष्ट्रमध्ये इतर विषय चर्चेत आहेत त्याचबरोबर आमच्या कडे ही सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी आता बहुरूपी करत आहेत.
घरचा प्रपंच चालण्याच आता अवघड झालं असून हाताला काम मिळणं ही कठीण झालं आहे. लॉकडाऊन च्या अगोदर जेवढं होत ते ही आता संपलं आता आमच्या लेकरा बाळांकडे , पाहून तर का होईना सरकारनं लक्ष द्यावे अशी विनंती हे बहुरूपी करत आहेत.
देव करो आपल्या मनोरंजनातुन खडखदून हसवणाऱ्या या बहुरूपीना पुन्हा एकदा त्यांना त्यांची कला सादर करण्याकरिता वाव मिळो.