म्हसळा दुर्गवाडी चिरेगाणीदेवी मंदिर रस्त्याचे खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते भूमिपूजन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

म्हसळा दुर्गवाडी चिरेगाणीदेवी मंदिर रस्त्याचे खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते भूमिपूजन

 म्हसळा दुर्गवाडी चिरेगाणीदेवी मंदिर रस्त्याचे खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते भूमिपूजन


 अरुण जंगम-म्हसळा
कोरोना प्रादुर्भाव काळात खासदार सुनिल तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील विकास कामांना गतीमान पध्दतीने हाताळण्यास सुरुवात केली असुन माहे मार्च 2020 पुर्वी शासन मंजुरी कामांचे पूर्ततेसाठी लोकाग्रहास्तव छोटेखाणी भूमिपूजन कार्यक्रम करण्यात येत आहेत. 

म्हसळा दुर्गवाडी-चिराठी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले चिरेगाणीदेवी मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आज दि.12 सप्टेंबर रोजी करण्यात आले. रस्ते अनुदान योजने अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्याचे संपन्न झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांचे समावेत जिल्हा परिषद कृषि सभापती बबन मनवे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, नगरसेविका सेजल मांडवकर,गटनेते संजय कर्णिक, शिवसेनेचे पदाधिकारी बालशेठ करडे, संतोष मांडवकर,करण गायकवाड,सुनिल शेडगे,संजय खताते, भाई बोरकर, तहसीलदार शरद गोसावी,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,पी.आय.धंनजय पोरे,गाव अध्यक्ष रघुनाथ बांद्रे,नगरपंचायत अधीक्षक आंग्रे,अंगणवाडी सेविका अमिता कर्णिक,संतोष उद्दरकर,उदय कळस,महेश पवार आदी मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते.

 कोरोना प्रादुर्भाव बाबतीत खबरदारी घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. म्हसळा शहरातील नगर पंचायत हद्दीत चार किमी अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चिरेगाणी देवी मंदिर शेजारी दुर्गवाडी आणि चिराठी हि दोन गावे मध्य ठिकाणी वसलेली आहेत येथे अनेक वर्षे रहदारीचा व अन्य सेवा सुविधांचा अभाव होता आता खासदार, आमदार तटकरे यांचे माध्यमातून या गावांची विकास पूर्ती होत असल्याने ग्रामस्थांनी आंनद व्यक्त केला व खासदार तटकरे यांचे कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट करून जल्लोषात स्वागत केले. ग्रामस्थांनी गावाकडे जाणाऱ्या काही अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासाठी व दुरुस्ती करणे कामी नव्याने निवेदन सादर केले आहे त्याची पूर्तता लवकरच करू असे आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment