Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

"शिक्षक दिन"! डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

 "शिक्षक दिन"! 




हा दिवस भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्यानंतर झालेले दुसरे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून साजरा केला जातो. 



डाॅ राधाकृष्णन् एक आदर्श शिक्षक होते. त्यांनी ४० वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करतानाच एक सुसंस्कारीत पिढी घडवण्याचे काम केले. मूल्याधारित शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्याकामी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून या दिवशी शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो.



पुढे सार्वजनिक जीवनात,  राजकारणात आलेल्या अनेकांनी आपल्या पूर्वाश्रमात शिक्षकी पेशा पत्करला व ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. महाराष्ट्रात साने गुरुजी, आचार्य अत्रे, महर्षी धोंडो केशव कर्वे, प्रकाश मोहाडीकर, ईरावती कर्वे, इंदिरा संत या आणि अशा अनेक विभूतींनी आयुष्याच्या एका वळणावर शिक्षकी केली होती.



पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या माझ्या सर्वांना सर्व शिक्षक मित्रांना व मार्गदर्शकांना हार्दिक शुभेच्छा!


डॉ.भारतकुमार राऊत

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सर्व शिक्षकवृंदास ओम lights च्या वतीने विनम्र अभिवादन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies