रंगीबेरंगी फुलांनी बहरला कास पठार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

रंगीबेरंगी फुलांनी बहरला कास पठार

रंगीबेरंगी फुलांनी बहरला कास पठार....


कुलदीप मोहिते -कराड
पावसाची संततधार व धुक्याची दाट चादर असलेला हा कास पठार परिसर पर्यटकांच्या खास पसंतीचा पावसाळा सुरू झाला की   वैराण झालेल्या कास पठारावर जीव सृष्टी बहरायला सुरुवात होते जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते टप्प्याटप्प्याने इथे वेगवेगळी जैवविविधता अवतरून काही ठराविक काळात निरोप घेऊन नवीन फुलांना संधी देते व सप्टेंबर पर्यंत हे कास पठार विविध  रंगीबेरंगी फुलांनी बहरते .जागतिक  वारसा स्थळ तसेच जैविक विविधता असलेला कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करतात पण यावर्षी कोरोना संकट असल्यामुळे सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत पण निसर्गाला कोण रोखणार जागतिक दर्जाच्या कास पठारावर विविध रंगाची फुले  बहरण्याची सुरुवात झाली आहे मात्र पर्यटकाची शिवाय कोमजुन जाण्याची शक्यता आहेNo comments:

Post a Comment