खा.सुनील तटकरे यांच्या आवाहना नंतर म्हसळा नगरपंचायत अॅक्शन मध्ये: मास्क लाऊन न येणार्‍या नागरिकांवर कारवाई: - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

खा.सुनील तटकरे यांच्या आवाहना नंतर म्हसळा नगरपंचायत अॅक्शन मध्ये: मास्क लाऊन न येणार्‍या नागरिकांवर कारवाई:

 खा.सुनील तटकरे यांच्या आवाहना नंतर म्हसळा नगरपंचायत अॅक्शन मध्ये: मास्क लाऊन न येणार्‍या नागरिकांवर कारवाई:

अरुण जंगम-म्हसळा


म्हसळा बाजारपेठेत खा.सुनील तटकरे यांच्या आवाहनानंतर नगरपंचायत अॅक्शन मध्ये आली असून,गुरवारी म्हसळा बाजारोपेठेत मास्कचा वापर न करणार्‍या दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईमध्ये नगरपंचायत मार्फत दंडाची आकारणी करण्यात आली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये या रोगाबाबत अद्याप भीती असली तरी,म्हसळा शहरासहित संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये या रोगाबाबत कोणतेही गांभीर्य नाही असे खा.सुनील तटकरे यांना ७ सप्टेंबर रोजी म्हसळा दौर्‍यावर आले असताना दिसून आले होते.शहरातील ९० व्यापारी व नागरिकांच्या तोंडावर खा.तटकरे यांना मास्क न दिसल्याने त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत या बाबत खंत व्यक्त करीत संबंधित अधिकार्‍यांना फटकारले होते.खा.तटकरे यांच्या सूचनेनंतर गुरवारी म्हसळा नगरपंचायत मधील कर्मचारी व पोलिस कर्मचार्‍यांनी या कारवाईला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment