खालापूरात नदीतून वाहून आलेल्या हरण सदृश्य (भेकर)जातीच्या नर प्राण्याला जीवन दान......आदिवासीनी दिले जीवनदान....
दत्तात्रय शेडगे-खोपोली
खालापूर तालुक्यातील हाळ आदिवासी वाडीत नदीतून वाहून आलेल्या हरण सदृश्य (भेकर)जातीच्या नर प्राणी हा नदीतून वाहत आला असताना खालापूरचे प्राणीमित्र हनिफ कर्जीकर आणि आदिवासी बांधवानी या प्राण्याला वाचवले आहे.यावेळी खालापूर चे वन अधिकारी यांना कळविले असता तेही घटनास्थळी दाखल झाले असून या प्राण्याच्या शिंगाला थोडा मार लागल्याने त्याला औषधोपचार करून जंगलात मुक्त केले जाईल.असे वन अधिकारी पाटील यांनी सांगितले यांनी सांगितले आहे.
https://youtu.be/Qb8OVd5eK8Y