Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खबरदार ! थोबाड आवरा!

 खबरदार ! थोबाडं आवरा!


सभ्यतेने इतरांना पत्रकारिता करू द्या!  शीतल करदेकर

 (लेखिका या नँशनल युनियन आँफ  जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या   अध्यक्ष आहेत)

इतर चाय बिस्कुट पत्रकार आणि आपण कोणता चहा पिता?कोणती बिस्किटे खाता?हे सगळे जाणतात!

इतरांना हिणवण्याचा अधिकार आपणास कुणी दिला?

मुळात न्यायालयाने सांगूनही पत्रकारितेची कोणतीही आचारसंहिता न पाळणारे रिपब्लिकन चँनल व अर्णब गोस्वामी ,यांचा व पत्रकारितेच्या नीतिमूल्यांशी  काही देणे घेणं आहे अस दिसत नाही!

मूळात याला पत्रकारिता म्हणायची का हा सवाल आहे!

चँनल हाती आहे म्हणून कुणावरही काहीही बोलायचं,अरेरावी करायची,आव दादागिरीचा आणि ताव असायचा सभ्यतेचे!हे अगोचरधाडस कुठून आलं हे विचारतोय देश आणि आमचा महाराष्ट्र!

बातमीदारी करताना आक्रस्ताळेपणा कशासाठी,बाईट घेण्यासाठी अंगावर जाऊन प्रश्न विचारणे कशासाठी?

न्यायाधीश आहात का हे?

कुणीतरी चँनलवर येतं काही सांगत, मग अर्णवजी सांगतात,साबित हो गया की ये दोषी है,इसका खून हुआ है...

एनसीबीच्या तपासातील नावं ,माहिती बाहेर का जाते?

का  काही व्यक्तींना लक्ष्य करुन अब्रूवर आँनलाईन चिखलफेक सुरु आहे?

२०१७च्या मोबाईल चॅटवर दीपिका पदूकोणची चौकशी होणार!ठीक!..पण या चँनलसोबत इतरही चँनल्स जी काही याविषयावर बातमीदारी करत आहेत,हे पाहून... आश्चर्य वाटते!

चौकशी होणार आहे...गुन्हेगार साबीत नाही झालेत! मग आपणास परवाना आहे का अशाप्रकारे मिडिया विकृत ट्रायलचा?

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ,प्रेसकौन्सिलला विचारणा केली की चँनल्सवर काही नियंत्रण आहे की नाही?

यावर प्रेस कौन्सिलने चँनल्ससाठीही नियम असल्याचे सांगितले!

भारतीय दंडविधानातील, विनयभंग, चारित्र्यहनन,समाजात विद्वेष निर्माण करणे,तेढ निर्माण करणे,गैरसमज पसरवणे हे सगळे आहेतच ना! याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना लक्षात घेऊन स्वतःचे आचरण व संहिता ठरवणे आवश्यक आहे!...हे ज्यांना पायाभूत ज्ञान नाही अथवा कळूनही सगळे कायदे नियम पायदळी तुडवून मिडिया म्हणून घुसखोरी करत असतील तर ती पत्रकारितेला लागलेली कीड आहे असंच म्हणावं लागेल!

सत्य समाजासमोर आणताना आपण जर एकांगी,पूर्वग्रहदुषित बातमीदार आणि दोषारोपण करत असाल तर ही कसली पत्रकारिता?

ही तर दलालखोरी!

अशी पत्रकारिता लोकशाहीचे लचके तोडणारी,जनतेच्या हक्काची पायमल्ली करणारी असते!

काल दि २४सप्टेंबर२०२०रोजी मुंबईत एनसीबी कार्यालयाबाहेर जे घडलं ते भयंकर होतं!

एक पत्रकार नसलेला चँनलवर गेस्ट म्हणून येणारा व्यक्ती आणि सर्कस करणारा प्रदीप भंडारी यांनी तुच्छतेने जे वक्तव्य इतर पत्रकारांना पाहून केले ते निषेधार्ह आहेच! म्हणून सर्वप्रथम जाहीर निषेध!

मुंबईत देशभरातून पत्रकार येतात आपलं काम करतात, मग कालच असं का घडलं?

काय उद्देश यांचा?

मुंबईत दंगल करणे,वातावरण बिघडणे,मग सरकारवर चिखलफेक करणे... हा उद्देश आहे का?हीच सुपारी?

अरे हो अख्खा नारळ!स्टुडियो, चँनल सगळं प्रायोजित आहे का हे शोधायला हवं! प्रारंभापासून जीवघेणा माज सुरु आहे यांचा!

मुंबईत चँनल चालवता...चालवा ! 

अभिव्यक्तीच्या नावाखाली हे थैमान घालणं जास्त काळ चालणार नाही!

चँनल्समधे टीआरपीसाठी स्पर्धा असते पण इतका द्वेष आणि पत्रकारांना हिणवण्याचे काम कुणीही करु नये!हे पत्रकारितेच्या सभ्यतेचे बसत नाही!

महत्त्वाचे म्हणजे हे महाराष्ट्रात चालत नाही,चालणार नाही!

आवरा... थोबाड!सभ्यतेने  इतरांना पत्रकारिता करु द्यात!

नाहीतर एक दिवस जनताच अशांची थोबाडं काळी करेल!
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies