शाळा ,महाविद्यालये सुरू करा लहुजी सेनेची मागणी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

शाळा ,महाविद्यालये सुरू करा लहुजी सेनेची मागणी

 

शाळा ,महाविद्यालये सुरू करा

लहुजी शक्ती सेनेने केले आंदोलन 

प्रियांका ढम-पुणे


 --- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन् केला होता.परंतु आता सर्व टप्प्याटप्प्याने दुकाने ,कारखाने ,उद्योग ,मॉल व इतर सर्वच  सुरू करण्यात आले आहे .आता मंदिरे ,मस्जिद ,चर्च ,गुरूद्वारा हे सर्व चालू करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे .परंतु ज्यांच्या हातात देशाचे भविष्य आहे . ती उद्याची पिढी त्यांचे शिक्षण बंद आहे .शिवाय गरीब आणि ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पोहचत नाही .त्यामुळे लवकरात लवकर सर्व उपाय योजना करून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याची मागणी आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण संचालक कार्यालय पुणे स्टेशन येथे करण्यात आले .या वेळी जिल्हाधिकारी व शिक्षण संचालक यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

          या आंदोलनात पुणे शहरातील महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी अविनाश खिलारे शहराध्यक्ष,सनी साळवे कार्याध्यक्ष,संजय फासगे जिल्हाध्यक्ष,अनिकेत जवळेकर ,सत्यभामा आवळे,नितीन वायदंडे ,दत्ताभाऊ धडे,कुमार खंडागळे,विजय गाडे,भावेश कसबे, लोपाताई भगत ,सुनीता अडगळे यासह शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment