श्रीवर्धन मधील कोंडीवली येथे खैर तस्कर गजाआड - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

श्रीवर्धन मधील कोंडीवली येथे खैर तस्कर गजाआड

 श्रीवर्धन मधील कोंडीवली येथे खैर तस्कर गजाआड

ग्रामस्थांची सतर्कता वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

अमोल चांदोरकर - श्रीवर्धन श्रीवर्धन तालुक्यात असलेल्या राखीव जंगलातुन मौल्यवान साग,खैर, शिसव जातीची लाकडे चोरणारे तस्कर सक्रिय झाले आहेत.वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच ही वृक्षतोड होत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.वन विभाग या गोष्टींकडे काना डोळा करीत असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील कोंडीवली येथील ग्रामस्थांनी पाळत ठेऊन रात्री खैराच्या लाकडांची तस्करी करताना दोन चोरांना गावकऱ्यांनी पकडून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.    कोंडीवली येथील जंगलातून मौल्यवान अशा खैराच्या झाडांची बेकायदेशीर तोड होउन त्याची तस्करी होत आहे अशी कुणकुण गावकऱ्यांना लागली होती. वनरक्षक व अधिकारी या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले त्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःहून पाळत ठेउन चोरांना पकडण्याचे धाडस केले व त्यांना त्यामध्ये यश देखील आले.या मध्ये दोन चोर गावकऱ्यांच्या हाती लागले मात्र मिळालेल्या माहिती नुसार तब्बल बारा जणांची टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून कोंडीवली गावच्या जंगलात सक्रिय असल्याचे समजते आहे त्यापैकी नऊ जण जंगलामध्ये आॕगस्ट महिन्यापासुन ठाण मांडून राहत असल्याचे समजते आहे.मात्र या सर्व गोष्टीचा वनविभागातील अधिकाऱ्यांना अजीबात कानोसा कसा नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत असून वनविभागातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त होत आहे.

गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालुन दाखवलेल्या धाडसानंतर वनविभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांना जाग आली.व त्यानंतर अधिकाऱ्यांनी  केलेल्या या कारवाईमध्ये खैर वाहतूक करणारे वाहन क्रमांक एम एच -१०- बी एम - ५३१२ ताब्यात घेतले असुन सुमारे सातशे किलो तोडलेले व तासून ठेवलेले खैर लाकुड जप्त करुन भारतीय वन अधिनियम १९२७ कलम ४१ (२ ब) ४२,२६ डी इ एफ एच व ६५ अॕक्ट कलमानुसार  गुन्हा दाखल केला असून श्रीवर्धन वनक्षेत्रपाल श्री राऊत अधिक तपास करीत आहेत.


 

कोंडीवली येथील ग्रामस्थांनी खैर चोरांना रात्री आठ वाजल्यापासुन मुद्देमालासह पकडून ठेवले होते परंतु त्यांनी पोलीस किंवा वनविभागाला तात्काळ कळविले नाही आम्हाला वनविभागाच्या मोबाईल स्काॕड द्वारे या घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहचून कारवाई केली.तोडलेले खैराचे लाकुड वनविभागाच्या जमिनीतून अथवा खाजगी मालकी जमिनीतून तोडले आहे का याची चौकशी करीत असून जर खाजगी जमिनीमधून तोडले असेल तर त्यासाठी नियम वेगळे व वनविभागाच्या जमिनीतुन तोडले असेल त्यासाठी नियम वेगळे असून या प्रकरणाचा कायद्याच्या कक्षेत राहून पुढील तपास व कारवाई करीत आहोत.

मिलिंद  राऊत

वनक्षेत्रपाल श्रीवर्धन

No comments:

Post a Comment