डिकसळ गाव व कर्जत कल्याण मार्गावर हायमास्ट पथदिवे ;
ग्रामस्थांच्या मागणीला यश
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत कल्याण महामार्गावरील डिकसल येथील ग्रामस्थांनी या कोरोना महामारीच्या धर्तीवर गावातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर पथदिवे व गावात धूर फवारणी करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे उमरोली ग्रामपंचायत तर्फे आज हायमास्ट दिवे डीकसळ व परिसरात लावण्यात आले.
कर्जत कल्याण महामार्गावर डिकसळ हे गाव महत्वाची बाजारपेठ म्हणून नावारूपाला येत असताना गावातील आईडीबीआय बँकेपासून ओमकार अपार्टमेंट पर्यंत रस्त्यावरील विजेचे दिवे गेल्या महिन्याभरापासून बंद होते. तसेच शांतीनगर येथील भारतीय संविधान स्तंभाजवळील विजेचे दिवे मागील दोन आठवड्यापासून बंद असल्याने गावात पथदिव्यांची मागणी तसेच गावात कोरोना चे संकट वाढत असताना सगळ्या ठिकाणी निर्जंतुकीकरण व्हावे , अशी मागणी डिकसळचे किशोर गायकवाड व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली होती. वाढते साथीचे आजार , कोरोना तसेच लोकांची वाढलेली बेरोजगारी यामुळे वाढलेले गुन्हे यासाठी लोकांकडून गाव व रस्ते याठिकाणी पथदिव्यांची मागणी लोकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत होती. सदर गोष्टींचे निवेदन किशोर गायकवाड यांनी उमरोली ग्रामपंचायत येथे 4 तारखेला दिले होते . त्यावर कार्यवाही करत ग्रामपंचायतने आज 6 रोजी रस्ते व गाव अंतर्गत परिसरात हायमास्त पथदिवे लावण्यात आले.
No comments:
Post a Comment