राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राकेश चाळके यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, September 24, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राकेश चाळके यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार

 राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. राकेश चाळके यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार


ओंकार रेळेकर-चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ.  राकेश चाळके यांचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नुकताच कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल डॉ.  श्री. चाळके यांनी कृतज्ञता व्यक्त करत आपली रुग्णसेवा अशीच सुरू राहील अशी ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.


कोरोना संकटाच्या काळात डॉ. राकेश चाळके दाम्पत्य रुग्णांची अविरतपणे सेवा करीत आहेत. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना दिलासा मिळत आहे. यामुळे ते कोविड योद्धा म्हणून ओळखले जात आहेत. याची दखल घेऊन चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये डॉ. राकेश चाळके यांचा माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष इक्बाल मुल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


यावेळी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, नितीन ठसाळे, माजी नगरसेविका निर्मला चिंगळे,  खेर्डीचे माजी सरपंच व सदस्य दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष समीर काझी,  रियाज खेरटकर, खालिद पटाईत, सचिन पाटेकर,  राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश, सिद्धेश लाड,  खालिद दाभोळकर, संदेश गोरीवले, रोहन इंगवले,  सचिन साडविलकर, रूपेश इंगवले,  मनोज जाधव, शहबाज कटमाले, वात्सल्य शिंदे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment