जेष्ठ मराठी सिनेनट मकरंद अनासपुरे यांची सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे कलामहाविद्यलयास सदिच्छा भेट... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

जेष्ठ मराठी सिनेनट मकरंद अनासपुरे यांची सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे कलामहाविद्यलयास सदिच्छा भेट...

जेष्ठ मराठी सिनेनट मकरंद अनासपुरे यांची सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे कलामहाविद्यलयास सदिच्छा भेट... 

       ओंकार रेळेकर-चिपळूणकोकणातील अग्रगण्य असणारे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कलामहाविद्यालयास सतत कलाक्षेत्र व राजकीय क्षेत्रातील मंडळी भेट देत असतात. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे केंद्रबिंदू ठरलेले हे कलामहाविद्यालय सतत प्रकाश झोतात कसे राहील या साठी संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार शेखर निकम व कलामहाविद्यालयाचे चेअरमन जेष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के हे कायम प्रयत्नशील असतात. या सर्व कारणांमुळे कोकण दौऱ्यावर असणारे मराठी चित्र सृष्टीतील सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते व नाम फॉउंडेशनचे अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी वेळात वेळ काढून सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या कलामहाविद्यालयास भेट दिली. त्यांनी संपूर्ण महाविद्यालय व कलादालन यामधील कलाकृतीचे खूप कौतुक केले व कलामहाविद्यालयास खूप शुभेच्छा दिल्या.तसेच मा. चेअरमन प्रा. प्रकाश राजेशिर्के यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना या महाविद्यालयाची चित्र स्वरूपात आठवण भेट मा. प्राचार्य. माणिक यादव यांच्या हस्ते देण्यात आली.

No comments:

Post a Comment