महाराष्ट्र मिररचा दणका,वारुंजी गावचे प्रशासन झालं जाग - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 11, 2020

महाराष्ट्र मिररचा दणका,वारुंजी गावचे प्रशासन झालं जागमहाराष्ट्र मिररचा दणका 

कराड जवळील वारुंजी गावचे
 प्रशासन खडबडून जागेकचरा टाकणारे सावधान आपण सीसीटीव्हीत होणार  कैद व पाच हजार द्यावा लागणार दंड

महाराष्ट्र मिरर टीम -सातारागेल्या आठवड्यामध्ये आमचे पत्रकार हेमंत पाटील यांनी केलेल्या बातमीत "वारुंजी गावच्या वेशीवरच कचऱ्याचे साम्राज्य" या मथळ्याखाली बातमी केली होती .

मात्र काही दिवसांपूर्वी कराड हे स्वच्छ शहर म्हणून देशात पहिले आले होते त्यामुळे याठिकाणी प्रश्न उपस्थित केले जात होते .

वारुंजी गावच्या तसेच आजूबाजूच्या लोकांनी महाराष्ट्र मिररच्या प्रतिनिधींना फोन करून वारंवार कचऱ्याचा बद्दल सांगण्यात येत होते मात्र आता यापुढे सावधान कचरा टाकताय

आता आपण सीसीटीव्हीत कैद

होणार वारुंजी गावाने चक्क सीसीटीव्ही बसवलेत जेणेकरून कोणी कचरा टाकू नये 

तसेच एक बोर्ड लावण्यात आला आहे त्यामध्ये असे लिहण्यात आले आहे वारुंजी गावच्या हद्दीत कोणीही कचरा टाकू नये नाहीतर पाच हजार दंड घेण्यात येईल 

यावर ग्रामपंचायत वारुंजी ग्रामविकास अधिकारी आणि प्रशासक ग्रामपंचायत वारुंजी

असे लिहण्यात आले आहे 

  महाराष्ट्र मिरर नेहमीच असल्या घाणीच्या साम्राज्यावर प्रकाशझोत टाकत राहील व समाजातील असल्या चुकीच्या गोष्टीची नागरिकांसमोर वाचा फोडण्यासाठी कटिबद्ध आहे.

सध्या कराडमध्ये व आजूबाजूच्या परिसरात कोरोना ने अक्षरशहा थैमान घातलेले आहे व सर्व ठिकाणी हॉटेल बस स्टेशन सरकारी ऑफिस नगरपालिका ग्रामपंचायत या सर्वच ठिकाणी स्वच्छता राखली जाते मात्र रस्त्याकडेला अशाप्रकारे कचरा करून आपण स्वतः कोणत्या ना कोणत्या रोगाला आमंत्रण देत आहोत तरी या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जावी असे जवळील नागरिकांकडून समजते तसेच येथे कुत्र्यांचा वावर वाढला असून एक लहान मुलगा कचरा टाकताना दिसत आहे मात्र यात कचरा कुंडी जवळ एखाद्या कुत्र्याने या लहानग्या मुलाला चावा वगैरे घेतला तर पुढील परिस्थितीला कोण कारणीभूत मात्र आजूबाजूच्या परिसरातील नागरिक संतापले असून लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे असे वृत्त आमचे वार्ताहर हेमंत पाटील यांनी दिले होते मात्र प्रशासनाने याची दखल घेत सीसीटीव्ही बसवल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment