"किल्लारी "
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातले एक छोटेसेच पण टुमदार व आनंदी गाव. २९ सप्टेंबर १९९३च्या रात्री हे गाव झोपले, ते पुन्हा न उठण्यासाठीच. ३० सप्टेंबरच्या पहाटेच धरती थरथरू लागली व काय होतेय, ते कळायच्या आतच सारे काही संपले, उध्वस्त झाले.
किल्लारीच्या या कर्दनकाळ भूकंपाला आज २७ वर्षे झाली. तब्बल सात हजार माणसे ठार झाली, शेकडो घरे जमीनदोस्त झाली. बेपत्ता किती झाली व किती मृतदेहांची ओळख न पटताच त्यांच्यावर सामुहिक अंत्यसंस्कार करावे लागले, याचा तर पत्ताच नाही.
निसर्गाच्या या हल्ल्यानंतर जन्माला आलेली मुले आता युवक झाली आहेत. त्यांच्यासाठी हा भूकंप म्हणजे केवळ 'इतिहास'! पण जगल्या-वाचल्या जुन्या गावकऱ्यांच्या मनावरील जखमांचे खोल व्रण अद्यापही कायम आहेत.इतक्या भयानक नैसर्गिक कोपानंतरही अशा आपत्तींशी कसा सामना करायचा, याची परिणामकारक उपाययोजना करण्यात आलेली नाही, असे गावस्करी सांगतात.
भूकंपाची पूर्वसूचना देणारी खर्चिक यंत्रणा किल्लारीच्या परिसरात मोठा गाजावाजा करून बसवण्यात आली खरी, पण ही यंत्रणा काही काळातच नादुरुस्त होऊन बंद पडली. आता ती कुठे आहे, हेही कुणाला ठाऊक नाही.
किल्लारीच्या २७ वर्षांपूर्वीच्या दु:स्वप्नाची कहाणी अशी आहे.