मार्ली घाट खून प्रकरण आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 1, 2020

मार्ली घाट खून प्रकरण आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडीमार्ली घाट खून प्रकरण आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी

मिलिंद लोहार-सातारा
जावळी तालुक्यातील मार्ली घाटात खून करून टाकलेल्या पती-पत्नीच्या प्रकरणाला खळबळजनक वळण लागले असून या दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचाही खून झाल्याचे सोमवारी (दि.३१) उघड झाले. संशयित आरोपी योगेश निकम यांच्यावर मेढा पोलिस स्थानकामध्ये चार जणांच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला मेढा न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


गुन्ह्याची व्याप्ती व त्यातील गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते घटनेकडे बारीक लक्ष देऊन आहेत. मंगळवारी (दि. १) सकाळी त्यांनी घटनास्थळी भेट दिली व घडलेल्या घटनेची सखोल माहिती घेतली. यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना एसपी तेजस्वी सातपुते म्हणाल्या, मेढा घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहांची माहिती घेतली जात असून वैद्यिक शाळेत ते तपासणीसाठी पाठवली जाणार आहेत. संशयित आरोपीने या संदर्भात केलेला गुन्हा विचारात घेता पोलिस तपासात अन्य काही बाबी समोर येतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

No comments:

Post a Comment