कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यात पँथरचा झंझावत, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 29, 2020

कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यात पँथरचा झंझावत, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका

 कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यात पँथरचा झंझावत, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका

संतोष सुतार-माणगांव   रायगड जिल्ह्यामध्ये दलित युथ पँथरचा झंझावत सुरू असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पॅंथर संघटनेच्या बांधिलकीचे काम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या अधिपत्याखाली तसेच रायगड जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत सुरु आहे. २६ सप्टेंबर रोजी कर्जत येथील कडाव बुद्धविहार या ठिकाणी कर्जत, खालापूर ,पनवेल  या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याच वेळेस संघटनेच्या माध्यमातून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

     यावेळेस उपस्थित सर्व पदाधिकारी यांना संघटनेची ध्येयधोरणे संघटनेचे संस्थापक भाईसाहेब जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रवक्ते प्रशांत पारधे यांनी योग्य मार्गदर्शन करुन समजावून सांगितली. तसेच कर्जतमध्ये लवकरच नऊ शाखा यांचे अनावरण भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे येथील पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

   या वेळेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण रोकडे, जिल्हा युवा अध्यक्ष अंकुश सुरवसे, कर्जत तालुकाध्यक्ष अक्षिरुद्ध पवार, सचिव गणेश नाईक, कार्याध्यक्ष रोहीत ढोले, युवा अध्यक्ष रोशन गोतारणे , युवा उपाध्यक्ष रोहीदास सोनावणे, प्रसिद्धी प्रमुख महेश साळवे, तसेच खालापूर तालुका उपाध्यक्ष रोशन मोरे, सचिव सुरज केदारी, युवा अध्यक्ष रोहीत गायकवाड, सल्लागार अमित केदारी, युवा उपाध्यक्ष सागर केदारी, प्रसिद्धी प्रमुख आविष्कार केदारी, संघटक ऋषिकेश जाधव, युवा सरचिटणीस मयुर कांबळे तसेच पनवेल तालुकाध्यक्ष सुदर्शन साबळे, कार्याध्यक्ष संतोष डोंगर दिवे, कामोठे शहर अध्यक्ष शैलेश कांबळे, तालुका संघटक सागर इंगोले यांना पदभार देण्यात आला.

   या वेळेस संघटनेचे संस्थापक भाईसाहेब जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा महासचिव रोहीत सकपाळ, प्रवक्ते प्रशांत पारधे महाराज शिगवण यांची प्रमुख उपास्थिती होती.

No comments:

Post a Comment