श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिंदे, ता.जि.नाशिक येथे "शिक्षक दिन" online पद्धतीने उत्साहात साजरा....
5 सप्टेंबर "डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन" यांच्या जयंती निमित्त, "शिक्षक दिन" साजरा करण्यात आला. प्राचार्य श्री.एन. वाय.पगार सर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, श्री. टोंगारे सर यांनी online कार्यक्रमाचे नियोजन केले. इयत्ता 5 वी ते 7 वी, इयत्ता 8 वी ते 10 वी, 11 वी व 12 वी असे गट करून सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने, "वक्तृत्व स्पर्धा" व "निबंध लेखन स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी घरी केलेल्या भाषणाचे व्हिडिओ तसेच निबंध लेखनाचे फोटो व्हाट्सअप ग्रुपवर पाठविले. सर्व व्हिडिओतून व निबंध लेखनातून गट निहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले. विद्यार्थ्यांनी पाठवलेले व्हिडिओ व निबंध लेखनाचे परीक्षण श्री. टोंगारे सर,श्री.बडे सर, श्रीम. वसावा मॅडम, श्रीम. गवळी मॅडम, श्रीम. नवले मॅडम, श्रीमती आरोटे मॅडम यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे सर्व शिक्षक व प्राचार्य यांनी अभिनंदन केले. विद्यालयात प्राचार्य श्री. पगार एन. वाय. सर यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. यावेळी श्रीम. वाळेकर एस. आर.,श्रीम. गावित एस. यु., श्री. टोंगारे के.सी.,श्री. जाट एस. एस., श्री. जाधव एस. डी., श्री. अण्णा पवार , श्रीम. सुशीला कडाळी उपस्थित होते. online कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधु भगिनींनी मेहनत घेतली.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक श्री. सुरेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षक व प्राचार्य यांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.