आदिवासी महिलांना रानमेवा चिंचण्यांतुन रोजगार , बाजारात आवक वाढली ,5 रुपये जुडी !
संतोष सुतार-माणगांव
पावसाळ्यात येणाऱ्या विविध रानभाज्यांसोबत अनेक फळे ,फुले व खाण्याच्या बाबी मुबलक प्रमाणात उगवतात. पावसाळ्यात उगवणाऱ्या तृणातील चिंचण्या नावाचे तृण कोकणातील मालरानावर मुबलक प्रमाणात उगवते.शेंगेच्या आकाराच्या चिंचण्या या तृणावर मिळतात.अतिशय चविष्ट व आरोग्याच्या दृष्टीने पाचक असलेल्या या चिंचण्या ऑक्टोबर महिन्यात पावसाळा परतीच्या काळात खाण्यायोग्य होतात.
माणगाव,तळा, म्हसळा इ .बाजारपेठेत माळरानात मिळणाऱ्या या चिंचण्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत .आदिवासी बांधव ,भगिनी या चिंचण्या विक्रीसाठी आणत आहेत.पाच रुपये जुडीने या चिंचण्या मिळत आहेत.रूचकर ,चविष्ठ या चिंचण्या टाईमपास म्हणून अनेक जण खाण्यास पसंती देतात.पाचक व आरोग्यवर्धक असलेल्या या चिंचण्या वाळवून त्यांची चिक्की सुद्धा केली जाते. काही भागात विविध पदार्थात या सुकवलेल्या चिंचण्यांचे दाणे टाकले जातात.
या चिंचण्या विक्रीतून आदिवासी महिलांना एक चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
गेल्या सात महिन्यापासून रोजगार बुडालेल्या आदिवासी महिलांना चिंचण्या विकून चांगला रोजगार मिळत आहे.दिवसाला 150 ते 200 रुपये यातून आर्थिक कमाई होत आहे.
चिंचण्या गावरान रानमेवा आहेत.या दिवसातच त्या मिळतात.रुचकर व स्वादिष्ट या चिंचण्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.वाळवून त्यांच्यापासून चिक्की केली जाते.पाच रुपयांना एक जुडी विकली जाते.
सीताबाई पवार,चिंचण्या विक्रेता .
सीताबाई पवार,चिंचण्या विक्रेता .