ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली च्या उपसरपंचपदी दिपाली भरत कांबरी यांची बिनविरोध निवड. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली च्या उपसरपंचपदी दिपाली भरत कांबरी यांची बिनविरोध निवड.

 ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या उपसरपंचपदी दिपाली भरत कांबरी यांची बिनविरोध निवड. 

नरेश कोळंबे -कर्जत       कर्जत तालुक्यातील चिंचवली च्या उपसरपंच पदाचा सुषमा रविंद्र बोराडे यांनी राजीनामा दिला व त्यानंतर सदर उपसरपंच हे पद रिक्त होते . या जागेवर बार्डी येथील रहिवासी असलेल्या दिपाली भरत कांबरी यांची निवड करण्यात आली आहे.

        चिंचवली ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी असलेल्या सुषमा रविंद्र बोराडे यांनी पदाचा राजीनामा दिला . व त्यामुळे सदर उपसरपंच हे पद रिक्त होते . सदर जागेसाठी दिपाली भरत कांबरी या एकमेव उमेदवार यांनी अर्ज भरला होता . या पदासाठी आज बुधवारी निवडणूक घेण्यात आली . यावेळी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत चिंचवली च्या सरपंच सुनीता मंगेश आहिर यांनी काम पाहिले. एकमेव अर्ज आल्या कारणाने उपसरपंच पदी दिपाली भरत कांबरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्यानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . त्यावेळी कर्जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कर्जत तालुका अध्यक्ष सागर शेळके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, सुर्याजी कडव, संतोष थोरवे, सुर्याजी बोराडे, मनोहर कांबरी , मोतीराम थेर, पंढरीनाथ कांबरी, बाळू ठोंबरे, प्रभाकर पाटील, प्रकाश कोळंबे,सुहास भगत, हृषिकेश भगत,उमेश कांबरी, शशिकांत जाधव, दशरथ कांबरी, सुरेश कांबरी , पंढरीनाथ कडव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment