Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काशिद-बिचवर पर्यटकांची दमदार एँन्ट्री : रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा

 काशिद-बिचवर पर्यटकांची दमदार एँन्ट्री : रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा


अमूलकुमार जैन-अलिबाग

पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशिद-बिचवर लॉकडाऊन नंतर तब्बल सात महिन्यानंतर पर्यटकांची दमदार एँन्ट्री दिसून आली !

     कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन त्यानंतर तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रिवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पर्यटन ठप्प झाले होते.पर्यटनात मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशिद -बिचवर पर्यटकांची सातत्याने वाढती वर्दळ असायची. देश-विदेशातील पर्यटकही याठिकाणी आवर्जून भेट देत असत.लॉकडाऊन नंतर सात महिन्यानंतर आज या ठिकाणी पर्यटकांची दमदार एँन्ट्री दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

     


  निसर्ग चक्रिवादळ व कोरोना महामारीतून सावरून येथील पर्यटन व्यवसायाला नुकतीच सुरुवात झाली.पर्यटकांच्या दमदार एँन्ट्री मुळे व्यावसायिकांवर समाधान दिसून येत आहे. पर्यटकांच्या सोयीसुविधात याठिकाणी खाद्य पेय विविध स्टाँल्स तसेच उंट-घोडागाडी, सँड बाईक सफरीचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटत आहेत.

 

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात तीन जून रोजी झालेल्या चक्रिवादळामुळे येथील प्रसाधनगृह व शौचालय यांची दूरवस्था असल्याने गैरसोयीमुळे ब-याच पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. शासनाच्या संबंधित पर्यटन विभागाने तसेच ग्रामपंचायतीने याकडे लक्ष पुरवून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने काशिद ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार-खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता,कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर असलेले लॉकडाऊन ,तीन जून रोजी झालेले निसर्गचक्रिवादळ यामुळे काशिद-बिचवरील स्टाँल्स, प्रसाधनगृह व शौचालय यांचे नुकसान झाले आहे. येथील शौचालय आता दुरुस्त होऊन पर्यटकांच्या सेवेसाठी तयार करण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies