सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट निर्मिती टीमने घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट
Team Maharashtra Mirror10/28/2020 07:13:00 AM
0
सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट निर्मिती टीमने घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट
कुलदीप मोहिते- कराड
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते सध्या त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार होत आहे याच पार्श्वभूमीवर "सरसेनापती हंबीरराव" या बिग बजेट चित्रपटाच्या संपूर्ण टीम संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम,रणजीत ढगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली भेट घेऊन संपूर्ण चित्रपटाविषयी माहिती दिली. स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर येत असताना आजच्या पिढीला स्वराज्याच्या शिलेदारांची माहिती समजत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. अशा भावना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या व सरसेनापती हंबीरराव चित्रपट टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.