बनावट एफडी पावतीद्वारे पाऊण कोटींचा अपहार ,फलटण येथील ग्राहक सेवा केन्द्र चालकाचा प्रताप ,गुन्हा दाखल होऊन झाली अटक
Team Maharashtra Mirror10/29/2020 08:57:00 AM
0
बनावट एफडी पावतीद्वारे पाऊण कोटींचा अपहार ,फलटण येथील ग्राहक सेवा केन्द्र चालकाचा प्रताप ,गुन्हा दाखल होऊन झाली अटक
प्रतीक मिसाळ- सातारा
फलटण येथील एका ग्राहक सेवा केंद्र चालकाने बनावट एफडी पावती ग्राहकांना देवून 71 लाख 50 हजार रुपये स्वत : च्या बँक खात्यावर जमा करत फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अजय शरद कुलकर्णी ( रा लक्ष्मीनगर ता.फलटण ) असे फसवणुकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , अजय शरद कुलकर्णी ( रा . लक्ष्मीनगर फलटण ) याचे फलटण येथील बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागे ग्राहक सेवा केंद्र आहे . या ग्राहक सेवा केंद्रात सुरेश किसन झांजुरणे ( वय 58 वर्षे रा नांदल , ता फलटण जि . सातारा ) व त्यांची पत्नी जयश्री झांजुणे हे दोघे 20 लाख रुपयांची एफडी करण्यासाठी गेले होते . दि .27 ऑक्टोंबर रोजी दुपारी सव्वा तीन ते सव्वा चार या वेळेत सदर रकमेची एफडी पावती दोघांना देण्यात आली . परंतु अजय कुलकर्णी याने दिलेल्या एफडीपावतीबाबत बँकेत चौकशी केली असता सदर पावती बनावट असल्याचे समजले . तसेच सुरेश झांजुर्णे यांनी दिलेली रक्कम प्रत्यक्षात मात्र अजय शरद कुलकर्णी याने स्वतःच्या नावावर जमा केले असल्याचे आढळले . बनावट एफडी पावतीद्वारे सुरेश झांजुरणे व त्यांची पत्नी राजश्री यांची वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे मित्र चित्रसेन यशवंत घाडगे यांचे 14 लाख रुपये , बबन विष्णु शिंदे हे यांचे । लाख रुपये व आप्पासो पर्वती बोबडे यांचे 17 लाख रुपये अशी सारी रक्कमही अजय कुलकर्णी याने स्वत : च्या नावावर जमा केल्याने निदर्शनास आले . या तिघांना एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर ही रक्कम मिळाली होती तसेच सदर रक्कम स्वतःच्या फायद्याकरता वापरली आहे .याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात सुरेश झांजुरणे यांनी फिर्याद दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यातील फिर्यादी यांचे 20 लाख रुपये निदर्शनास आल्यानंतर हस्तगत करून बँकेने फिर्यादीच्या खात्यावर वर्ग केले आहेत . राहिलेल्या साक्षीदारांचे 51 लाख रुपये अद्याप हस्तगत करायचे आहेत . याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे अधिक तपास करीत आहेत . दरम्यान फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेल्या अजय कुलकर्णी ग्राहक सेवा केंद्रात ज्यांनी एफडी केलेली आहे त्यांनी त्याबाबत बँकेत खात्यावर एवढी जमा आहे की नाही याबाबत खात्री करावी व तसे न झाले असल्यास फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .