शरद पवार यांच्या हस्ते आज होणार सरपंच परिषद पुणे यांचा लोगो अनावरण
कुलदीप मोहिते -कराड
सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रचा लोगो अनावरणाचा कार्यक्रम बारामती येथे खासदार शरद पवार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे उपस्थित सोमवारी दुपारी तीन वाजता पार पडणार आहे यावेळी राज्यातील सरपंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती रणजीत पाटील व त्यांचे इतर पदाधिकारी सरपंच पुणे परिषद यांनी दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अगदी मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग्य ते सोशल डिस्टंसिंग पाळून अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे अशीही माहिती सरपंच परिषद पुणे यांनी दिली