वात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे विजयादशमी सोहळा खेळीमेळीत संपन्न
महाराष्ट्र मिरर टीम-नाशिक
वात्सल्य वृद्धाश्रम, नाशिक येथे यावर्षी देखील विजयादशमी आजी आजोबा यांनी उत्साहात साजरा केला. अध्यक्ष सतीश सोनार यांनी यावेळी रिदम शहा यांचे कारवा कराओके क्लबचे गायक यांना आमंत्रित केले होते. कोरोना काळात बऱ्याच दिवसापासून वातावरण शांत असल्याने आणि सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाल्याने काही तरी विरुंगुळा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिदम शहा आणि त्यांचे सहकाऱ्यांनी अनेक जुनी हिंदी मराठी गाणी गाऊन आजी आजोबांचे मनोरंजन केले. आजी आजोबांनी देखील गाण्यांवर मस्त ताल धरून मनसोक्त आनंद लुटला. यामुळे वृद्धाश्रमात सर्वत्र आनंदीमय वातावरण होते. सदरहू कार्यक्रम हा सर्व नियमांचे पालन करूनच साजरा करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांनी याप्रसंगी समाजातील सधन लोकांनी या वृद्धाश्रमास जी काही मदत करता येईल त्याप्रमाणे करावे असेही सुचित केले.
याप्रसंगी रिदम शहा त्यांचे कलाकार, अध्यक्ष सतीश सोनार, चेतन संगमनेरे, ओम ठेपणे, वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी आणि चित्रपट दिग्दर्शक सुरेश चव्हाण उपस्थित होते.