मा.आ.रमेश कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 3, 2020

मा.आ.रमेश कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट

 मा.आ.रमेश कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली  सदिच्छा भेट

    गटनेते बिलाल पालकर,शिवानी पवार ,फैरोजा मोडक यांची उपस्थिती

ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर चिपळूण मध्ये आगमन झाल्यावर ठीक ठिकाणी कार्यकर्ते जल्लोषात स्वागत करित आहेत,चिपळूण नगरपालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते बिलाल पालकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगरसेवकांनी कदम यांच्या जयेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले,या वेळी गटनेते बिलाल पालकर,नगरसेविका शिवानी पवार ,फैरोजा मोडक उपस्थित होते.

चिपळूण नगरपालिकेत मागील अनेकवर्षं एकहाती सत्ता गाजविणाऱ्या माजी आमदार रमेश कदम विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत, आमदार शेखर निकम यांच्या निवडणूक प्रचार कार्यातह त्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता, चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणूनही रमेश कदम यांनी  उल्लेखनीय कामगिरी केली होती,त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे,आगामी नगरपालिका निवडणुकीतही कदम यांचे राष्ट्रवादी पक्षाला मोठा  फायदा होणार आहे,

No comments:

Post a Comment