पलुस परीसरात खतांचे लिंकेज शेतकरी त्रस्त ... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 3, 2020

पलुस परीसरात खतांचे लिंकेज शेतकरी त्रस्त ...

 पलुस परीसरात खतांचे लिंकेज शेतकरी त्रस्त ...                                             

सुधीर जाधव-पलूस,सांगलीसध्या द्राक्ष पीक छाटणी तसेच ऊस सुरु लागण व आडसाली लागणीसाठी बाळभरणीच्या कामाची लगबग पलुस परिसरामध्ये चालु आहे .सध्या त्यासाठी युरिया खताची मोठ्या प्रमाणात गरज असते हे लक्षात घेऊन पलुस परीसरातील कृषीसेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना गरजे इतका युरीया दिला जात नाही .युरीया सोबत इतर मिश्र खते घेणे बंधनकारक केले आहे 270रुपये किंमतीच्या युरीयाच्या गोणी साठी 5ते 6 हजारांची इतर खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.खत विक्री करणाऱ्याकडुन शेतकर्यांची  अडवणूक केली जात आहे.

        अवकाळी पाऊस , कोरोणा संकटामुळे आधीच शेतकर्यांचे कंबरटे मोडलेले आहे.त्यात खत विक्रेत्यांच्या अडवणूकिमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.कृषी अधिकारी या गोष्टिंकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असलेचे भावनेमुळे शेतकर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.सदर गोष्टिंमध्ये प्रशासकिय अधीकार्यांनी लक्ष घालुन शेतकर्यांची अडवणुक करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करणे तसेच युरीया विक्रीवर अंकुश ठेवणे गरजेचे  आहे . राज्याच्या कृषी राज्यमंत्री यांचे मतदार संघात अशाप्रकारे प्रशासनाचे दुर्लक्ष,कृषी केंद्रांचा लिंकेज कारभार व यामुळे शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय हा दुर्दैवी असून कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी या गोष्टिमध्ये लक्ष घालण्याची मागणी शेतकरयांकडून होत आहे.

     

                     

No comments:

Post a Comment