नव्या दमाचा कवी,प्रितम चौरे यांची कविता - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 25, 2020

नव्या दमाचा कवी,प्रितम चौरे यांची कविता


     नव्या दमाचा कवी

       प्रितम तानाजी  चौरे.

 बाप समजून घ्या जरा! सांजवेळी एक विचार मला सारखाचं छळत होता 
बाप कोणाला का समजत नाही ?
पुन्हा पुन्हा विचारत होता .
नि:शब्द झालो मी शब्दचं फुटेना 
काय उत्तर देऊ हेच मला सुचेना 
थोडावेळ विचारात पडलो आणि वाटलं, 
साहित्यात याचं उत्तर मिळेल .
बाप का कोणाला समजत नाही हे ही मिळेल .
मग साहित्याकडे वळुन पाहिलं 
पण इथेही 'बाप ' नावाचं पान कोरचं राहिलं 
आईवर होती शेकडो पुस्तकं आणि ग्रंथ,
बापावर एक ही काव्य लिहू शकलो नाही
हिच मनात राहिली खंत.
उत्तर मिळेल या आशेने समजाकडे पाहिलं 
पण बाप इथेही उपेक्षितचं राहिला होता 
त्या दिवशी बापात देव पाहीला होता.
शेवटी लक्षात आलं दोष साहित्याचा 
आणि समाजाचा ही नव्हता ,
दोष तर नजरेचा होता.
कारण दु:ख झाल्यावर आईचे अश्रु 
सगळ्यांना दिसले असावेत,
पण कदाचीत बापाचे त्याग दिसले नसावेत .
आई-वडिलांवर समान प्रेम करा,
आईपेक्षा वडिलांना समजून घ्या जरा.
ज्याच्या वाट्याला त्याग असतो अमाप,
त्याचं नाव म्हणजे बाप.


No comments:

Post a Comment