अक्षय गायकवाड यांनी रेस्क्यू केला विक्रमी लांबीचा अजगर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

अक्षय गायकवाड यांनी रेस्क्यू केला विक्रमी लांबीचा अजगर

 अक्षय गायकवाड यांनी रेस्क्यू केला विक्रमी लांबीचा अजगर

महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत


खालापूर तालुक्यातील  रसायनी जवळच्या कांबे या गावात अक्षय गायकवाड या सर्पमित्रास दिनांक 18 अक्टोबर 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास स्नेक कॉल मिळाला. पावसाळी वातावरणात रात्रीच्या वेळी साप रेस्क्यू करणे हे अत्यंत जिकरीचे असतेयाची जाण असलेल्या अक्षयने आपल्या सोबत इतर सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठलं. त्या ठिकाणी पोचताच तो साप अजगर जातीचा असल्याचे लक्षात आले. अजगर जरी वरवर सुस्त असल्याचे भासवत असला तरी तो कधी काउंटर ऍटॅक करेल याची शाश्वती नसल्याने अक्षयने सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या होत्या. कृत्रिम प्रकाशात रेस्क्युअर्स त्या अजगराला सुरक्षित पकडण्यास सज्ज झाले. पूर्वानुभव असलेल्या अक्षयला हे ऑपरेशन थोडं कठीण वाटत होतं,  कारण सहसा 7 ते 8 फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या तुलनेत मोठा आणि वजनदार देखील होता. प्रचंड ताकद लावून अजगर पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे अक्षयची  दमछाक होत होती.  मोका मिळताच तो अजगर अक्षरशः चावा घेण्याचा प्रयत्न करत होता.  मात्र सावध असलेल्या अक्षयने सहकाऱ्यांच्या मदतीने शेवटी तो महाकाय अजगर पकडला.खोपोली खालापुर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला अक्षय गायकवाड हा गेली काही वर्षे सर्पमित्र म्हणून कामगिरी बाजवत असतो,  मात्र त्याने  अजगर जातीचा एवढा मोठा  सुमारे 11 फुटाचा साप पकडण्याची पहिलीच वेळ होती.


एवढ्या मोठ्या आकाराच्या अजगराला पकडण्यात यशस्वी झालेल्या अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांचे या क्षेत्रातील तज्ञ अभिजित घरत, रोहिदास म्हसणे, योगेश शिंदे, नवीन मोरे यांनी कौतुक केले. भारतीय अजगराला अनुकूल असे वातावरण या परिसरात असल्याचे सांगत, यापूर्वी 2 ते 3 वेळा एवढ्या मोठ्या आकाराच्या अजगरांचे रेस्क्यू ऑपरेशन स्नेक रेस्क्युअर्स खोपोली - खालापुरातील मेम्बर्सनी केल्याची माहिती त्यांनी दिली.


अक्षय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्या अजस्त्र अजगराला खालापूर तालुका वनविभागाच्या  निर्देशानुसार सुरक्षित वन क्षेत्रात मुक्त केले. आपल्या अधिवासात जाताना मात्र तो अजगर काही घडलेच नाही या थाटात होता.


: गुरुनाथ रामचंद्र साटेलकर


No comments:

Post a Comment