गोमतेच्या सेवेसाठी स्वतः रस्त्यावर उतरले श्री भाईनाथ महाराज मी पाहिले. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

गोमतेच्या सेवेसाठी स्वतः रस्त्यावर उतरले श्री भाईनाथ महाराज मी पाहिले.

 गोमतेच्या सेवेसाठी स्वतः रस्त्यावर उतरले श्री भाईनाथ महाराज मी पाहिले.

                      

            प्रेरणादायी

                     माझा अनुभव

               गुरुनाथ रामचंद्र साटेलकर
दिनांक 18 अक्टो 2020 रोजी भर दुपारी 3 वाजताच्या सुमारास मी सहकुटुंब पनवेलहून खोपोलीकडे येत होतो. महड गावाजवळ हाळच्या जवळ रस्त्याच्या कडेला मला गर्दी दिसली. काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. मी कार थांबवली आणि स्पॉट वर गेलो आणि पाहतो तो काय एक गायीचं वासरू पडलेले होते.   अज्ञात कारने त्याला ठोकरले होते आणि त्याची मदत करण्यासाठी प्रवासात असणाऱ्या खोपोलीच्या साई दरबार आश्रमाचे महंत श्री भाईनाथ महाराज स्वतः उतरले होते. आम्ही सर्वांनी त्या वासराची अवस्था ताडून त्याला लागलीच उपचारासाठी काहीतरी करावे लागेल यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गोरक्षक हनिफभाई कर्जीकर यांना कॉल केला. लागलीच सूत्रं हलली आणि त्या मुक्या वासराच्या मालकाची माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी जसे मदत करण्यासाठी श्री भाईनाथ महाराज थांबले त्याच बरोबर स्थानिक मुस्लिम युवक देखील मदतीला धावले  होते. जवळपास गाय गुरांचा समूह देखील थांबला होता. असे घडत असताना खेददायक बाब अशी होती की, शेकडो वाहनचालक दुर्लक्ष करून ही दररोजची घटना आहे म्हणून निघून जात होते.  त्या अपघातग्रस्त वासराच्या इलाजासाठी त्याच्या मालकाने प्रयत्न सुरू केले होते आणि आम्ही निःशंक मनाने पुढच्या प्रवासाला निघालो.


या घटनाक्रमावरून "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" या उक्तीची अनुभूती आली. श्री भाईनाथ महाराजांच्या चरणाला स्पर्श करण्याचा मोह आम्हा कुटुंबियांना आवरता नाही आला. फक्त तोंड देखली गोसेवा करणारे अनेकजण मी पाहतो मात्र या निमित्ताने दिसलेले श्री भाईनाथ महाराज मला आदर्शवत वाटले. सर्वांत महत्वाचे म्हणजे महाराजांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास अपघातात मदत करणाऱ्या आमच्या सदस्यांचा सन्मान केला होता त्यात "गो रक्षक" म्हणून हनिफभाई कर्जीकर यांचे जे कौतुक झाले होते,  तो क्षण  मला आठवला.  या दोघांनी दाखवलेली समयसूचकता आम्हाला प्रेरणादायी होती.No comments:

Post a Comment