आईच दूध .... फ्रिजमध्ये !
गुरू साटेलकर
डॉक्टरने Hormonal Problem मुळे Milk Deficiency आली आहे असे सांगितले . त्यावर औषध पण सुरु केली . पण त्याचा उपयोग होई पर्यंत खुप दिवस जातील तो पर्यंत बाळाने काय करायचे .
नवजात बाळाला आईच दूध किमान सहा महीने ते एक वर्ष भर मिळायला हव हे तर सर्वांनाच माहीत आहे . मग हे कस शक्य होईल . या विचारात मित्र होता .
परवा सकाळी त्याचा फोन आला होता . त्याने हां problem सांगितला आणि विचारल . महेश तुमच्या इकडे कोणी बाई मिळेल का बाळाला दूध पाजणारी .
माझ्यासाठी पण हां problem नवीनच होता . मी माझ्या आईला विचारल ... बाळाला दूध पाजु शकेल अशी बाई मिळेल का ? आई म्हणाली अशी बाई मिळेल . पण शोधायची कशी .
यातून मार्ग कसा काढायचा यासाठी आम्ही सगळी मित्र मंडळी त्यादिवशी जमलो . सगळे जण अशी बाई शोधायची कशी या विचारावर अड़कली होती . तेव्हा एक जण म्हणाला . पुण्यात ह्यूमन मिल्क बैंक आहे का ?
सगळी सतर्क झाली ... नवीन मार्ग सापडला होता . त्याने या बद्दल सांगितले की त्याने एक Foreign चे Article वाचले होते . कोणी तरी परदेशी स्त्री तिच्या बाळाला दूध पाजल्यावर शिल्लक राहिलेले किंवा वाया जाणारे दूध Donate करते . तिने तिच्या आयुष्यात कित्येक लिटर दूध Donate करून दुधाची आवश्यकता असणाऱ्या बाळांचे जीव वाचवले आहेत .
वहिणींची जशी आता परिस्थिति आहे तशी खुप स्त्रियांची होते किंवा कोणा बाळाची आई Delivery दरम्यान मरण पावते . अश्या बाळांसाठी हे दूध खुप मौल्यवान आहे .
आम्ही सर्वजण लगेच Internet वर शोधायला लागलो . Internet वर पटापट Result दिसायला लागले . आपल्या देशात अश्या 20 बैंक आहेत ज्या पैकी पुण्यात अश्या चार Human Milk Bank आहेत ज्याची आम्हाला माहितीच् नव्हती . माहितीच् नव्हती कारण अशी वेळ किंवा हां problem कधी कोणा बरोबर झालाच नव्हता त्या मुळे हां विषय समोर आलाच नाही .
आम्ही Internet वर त्या परदेशी स्त्री बद्दल पण शोधले . तिच नाव एलिसाबेथ अंडरसन . अमेरिकेत रहाते . तिला हाइपरलेटेक्शन सिंड्रोम झाल्या मुळे तिच्या शरीरात आवश्यकते पेक्षा जास्त दूध तयार व्हायला लागले . हे दूध वाया जात होते . त्यावर तिने उपाय शोधला आणि ती तिचे दूध Donate करायला लागली . आज पर्यंत तिने 2 हजार लिटर पेक्षा जास्त दूध Donate केले आहे .
आम्हाला या Problem वर नवीन मार्ग सापडला होता . आम्ही पटापट फोन लावले . खुप वेळा ते फोन engage लागले . बहुतेक खुप जणांना याची ग़रज असावी . ज्यांचे फोन लागले त्यांनी येऊन भेटा असे सांगितले . मित्र आज त्यांना जाऊन भेटेल .
माणस रक्तदान करतात . इतर माणसांचा जीव वाचतो . तसेच या स्त्रियां दूध दान करून आवश्यकता असलेल्या नवजात बाळांचे जीव वाचवतात .
माणसाच्या शरीरात या दोन मौल्यवान गोष्टी प्रवाहीत असतात . रक्त आणि दूध . हे Liquid Gold पेक्षाही मौल्यवान आहे .
एव्हढे मौल्यवान की यांच्या दानाने माणसांचा जीव वाचतो .
आपल्या मुंबईमध्ये
लोकमान्य टिळक हॉस्पिटल ( सायन हॉस्पिटल) सायन,
के. ई. एम. हॉस्पिटल ( परळ)
कामा हॉस्पिटल ( फोर्ट )
जे. जे. हॉस्पिटल (भायखळा)