17. एस.टी.चे बनावट पास वितरित केल्याप्रकरणी तरुणास अटक
निरंजन पाटील-कोल्हापूर
vo याबाबत समजलेली माहिती अशी दिगंबर गुरव हा कागल तालुक्यातील उंदरवाडी गावचा रहिवाशी आहे. त्याने लॉकडाउनमध्ये बनावट विध्यार्थी प्रवाशी पास तयार करून शिक्के मारून एस.टी.महामंडळाची फसवणूक केली आहे. याबाबत बानगे येथील रहिवाशी व राधानगरी डेपोतील कर्मचारी सागर आनंदराव पाटील यानी राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दिगंबर गुरव वर्षभर हा उद्योग हा करत आहे.परंतु एस.टी.मध्ये विध्यार्थी गर्दीत फारसे कोणाच्याही लक्षात आले नाही. परंतु गेले महिनाभरपासून अचानक विध्यार्थी पास असलेल्यांची गर्दी होऊ लागल्याने वाहकाना शंका आली. वाहकांनी राधानगरी डेपोत हा प्रकार सांगितल्यानंतर कोणीतरी बनावट विद्यार्थी पास तयार करून निम्म्या किमतीत विक्री करत असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. यानुसार एस.टी.चे कर्मचारी सागर पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल, पोलीस नाईक कृष्णात खामकर पोलीस हावलदार सुरेश मेटील कॉन्स्टेबल राहुल केने यांच्या पथकाने दिगंबर गुरव यास शिताफीने अटक केली.