दिवाळीच्या पहाटे उंब्रज जवळ भीषण अपघात पाच जण ठार तर सात जण जखमी
कुलदीप मोहिते कराड
जखमींना सातारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे मिनी बस वाशी वरून गोव्याकडे निघाली होती मिनी बस उंब्रज जवळ आली असता ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी तारळी नदीच्या पुलावरून 90 फूट खाली कोसळली यातील एक जखमी प्रवासी बाहेर आल्यामुळे या अपघाताची माहिती पोलिसांना व स्थानिकांना कळाली सातारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर बाहेर काढण्यात आले व सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ह्या अपघातामध्ये तीन पुरुष एक महिला व तीन वर्षांचा लहान मुलगा असे पाच जण जागीच ठार झाले आहेत