मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न करु - मंत्री जयंत पाटील आदित्य दळवी- - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 11, 2020

मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न करु - मंत्री जयंत पाटील आदित्य दळवी-

 मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी

सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न करु                                                           - मंत्री जयंत पाटील

आदित्य दळवी-
महाराष्ट्र मिरर टीममल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चितच प्रयत्न करु, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मल्टिप्लेक्सच्या  शिष्टमंडळास दिले.

   मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत आज UFO, Cinepolis व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे आज त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत चर्चा करुन लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

    मल्टिप्लेक्स सुरु करताना येत असलेल्या अडचणी, खाद्य पदार्थांना थिएटरमध्ये घेऊन जाण्याची परवानगी तसेच कर परती व इतर अनुषंगिक बाबीबाबत शासन स्तरावर मोठ्याप्रमाणात मदत करावी अशा या शिष्टमंडळाच्या मागण्या आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय महासचिव तथा अभिनेते सुदीप पांडे, Cinepolis चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवांग संपथ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रविन्द्र मानगावे, UFO चे सचिव प्रकाश चाफळकर, पदाधिकारी,अरविंद चाफळकर, शिरीष देशपांडे, विष्णू पटेल आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

No comments:

Post a Comment