मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बस पलटी,पाच जण जखमी ,एकाची प्रकृती गंभीर - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, November 11, 2020

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बस पलटी,पाच जण जखमी ,एकाची प्रकृती गंभीर

 मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बस पलटी,पाच जण जखमी ,एकाची प्रकृती गंभीर

महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली


मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अंडा पॉईंटजवळ खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत  मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी एम आर ट्रॅव्हलची बस पलटली .यात पाच जण गंभीर जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळतंय.जखमींना खोपोली आणि लोणावळा येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

बसमधील सर्व प्रवाशी जोधपूरहून(राजस्थान) पुण्याला निघाले असता अवघड वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून खोपोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
खोपोली पोलीस ,महामार्ग पोलीस,डेल्टा फोर्स,आय आर बी टीम,अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवले व अपघातानंतर झालेली दोन्ही लेनवरील वाहतूक कोंडी सुरळीत केली.

No comments:

Post a Comment