Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पुणे पदवीधर पूर्ण ताकदीनिशी लढणार शैलेश दादा मोहिते

 पुणे पदवीधर पूर्ण ताकदीनिशी लढणार शैलेश दादा मोहिते

राष्ट्रवादी तर्फे उमेदवारीसाठी इच्छुक

मिलिंद लोहार- पुणे 

पुणे पदवीधर संघात येणाऱ्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यातील पदवीधरांच्या आग्रहाखातर व यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन होऊ घातलेली 2020 - 2021 ची पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार शैलेश दादा मोहिते यांनी केला आहे  गेले वीस वर्ष मी जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणून   मी समाजकारण करत आहेत

शैलेश दादा मोहिते व त्यांच्या साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट उंब्रज तालुका कराड यांच्या  माध्यमातून  जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र मिरर सातारा टीमने संवाद साधला असता  राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले शरद पवार साहेबांच्या विचारानेच मी पुढे जात आहे त्यांनी मला जर एक संधी दिली तर नक्कीच समाजासाठी काम करण्यासाठी मी सदैव उभा असेल असे शैलेश दादा मोहिते यांनी महाराष्ट्र मिरर शी बोलताना सांगितले

विनामूल्य शस्त्रक्रिया आरोग्य शिबिरे मोतीबिंदू शिबिरे आरोग्य तपासणी शिबिर असो वा गरजू लोकांना आर्थिक मदत   कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन मध्ये गोरगरीब मजुरांना मोफत धान्य वाटप  तसेच ट्रस्टमार्फत कोरोना ची जनजागृती मास्क सॅनिटायझर वाटप विनामूल्य औषधे तसेच गरजूंना बेडही उपलब्ध करुन देण्यात आला असे त्यांनी सांगितले साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे सचिव शैलेश दादा मोहिते यांचे ज्येष्ठ बंधू जागतिक कीर्तीचे कॅन्सर तज्ञ डॉक्टर  उन्मेष मोहिते (md ecmo frcpa consultant hematologist oncologist england UK) यांच्या माध्यमातून कॅन्सर ब्लड कॅन्सर रक्ताचे इतर आजार असणाऱ्या अनेक रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले तसेच कॅन्सर रुग्णांना नामांकित हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून देण्यात आला तसेच त्यासाठी त्यांना आर्थिक ही मदत करण्यात आली असे शैलेश दादा मोहिते यांनी सांगितले

ग्राउंड लेव्हल वर काम करीत असताना मला पदवीधरांच्या ही अनेक समस्या आहे असे लक्षात आले त्यासाठी विद्यापीठ पातळीवर त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा केला तसेच त्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली त्यांना व्यवसायासाठी लागणारे कर्ज ही विविध बँकेमधून पाठपुरावा करून उपलब्ध करून  दिले गरजूंना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही करण्यात आली तसेच अनेक पदवीधरांची पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घेतली (ऑनलाइन ऑफलाइन) वरील सर्व प्रश्न मार्गी लावत असताना मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले मला राजकीय वारसा नसल्यामुळे मला पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी मला प्लॅटफॉर्म ची गरज आहे तसेच पुणे पदवीधर  मतदारसंघातील पदवीधरांची हीच अपेक्षा आहे व मला विविध संघटनांनी  पाठिंबा  जाहीर केला आहे म्हणून मी पदवीधर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती शैलेश दादा मोहिते यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध करून दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies