Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नगरपंचायतचे आरक्षण व सोडत शांततेत पार पडले महिलाराजच्या दिशेने माणगांव

 नगरपंचायतचे आरक्षण व सोडत शांततेत पार पडले महिलाराजच्या दिशेने माणगांव

रविंद्र कुवेसकर -उतेखोल/ माणगांव  

माणगांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२० सदस्य पदांचे आरक्षण व सोडतीचा उत्कंठावर्धक कार्यक्रम नियंत्रण अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी माणगांव प्रशाली दिघावकर व राहूल इंगळे मुख्याधिकारी माणगांव नगरपंचायत तसेच ललिता बाबर सध्याच्या प्रभारी तहसिलदार यांचे उपस्थितीत अत्यंत शांततेत पार पडला.  

या वेळी माणगांव मधिल जवळपास सर्वच नगरसेवक लोकप्रतिनीधी तसेच माणगांवकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

सन २०११ च्या जनगणनेनुसार अनुसुचित जमातीच्या  लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने वार्ड क्रमांक रचना करण्यात आली असून  सन २०१५ चे निवडणुकी करीता जुणे प्रभाग नंबर बदलले आहेत या मध्ये २०२० निवडणुकीकरीता  उतेखोल प्रभाग क्रमांक १ ते ४ कायम आहेत तर प्रभाग क्रमांक ५ नंबर चा प्रभाग आता ६ झाला  या प्रमाणे ६ नंबरचा १४, प्रभाग क्र ७ नंबरचा १३ तर ८ नंबरचा ७ तसेच ९ नंबरचा ८ व १० नंबरचा ९  तसेच ११ चा १० व १२ चा ११ नाणोरे तसेच  १३ चा १२ खांदाड १४ चा १५ खांदाड तसेच १५ चा १६ खांदाड आणि १६ चा १७ माणगांव व १७ चा ५ भादाव असे प्रभाग नंबर बदलले आहेत याची माणगांवकरांनी नोंद घ्यावी तसेच प्रभागवारी आरक्षण खालील प्रमाणे पडले आहे 

प्रभाग क्रमांक १] अनुसुचित जमाती महिला (ST.),

प्रभाग क्र. २] अनुसुचित जाती महिला (SC),

प्रभाग क्र. ३] खुला सर्वसाधारण, 

प्रभाग क्र. ४] नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,

प्रभाग क्र. ५] खुला सर्वसाधारण,

प्रभाग क्र. ६] खुला महिला,

प्रभाग क्र. ७] ना.मा. प्र. (सर्वसाधारण),

प्रभाग क्र. ८] ना.मा. प्र. महिला,

प्रभाग क्र. ९] खुला महिला,

प्रभाग क्र. १०] खुला महिला,

प्रभाग क्र. ११] अनुसुचित जाती सर्वसाधारण (SC),

प्रभाग क्र. १२] खुला महिला,

प्रभाग क्र. १३] ना.मा. प्र. महिला, 

प्रभाग क्र. १४] ना.मा. प्र. (सर्वसाधारण),

प्रभाग क्र. १५] खुला  (सर्वसाधारण),

प्रभाग क्र. १६] खुला  (सर्वसाधारण),

प्रभाग क्र. १७] खुला  (सर्वसाधारण)

या पुढील निवडणुक संदर्भात हरकती विषयी कार्यक्रम दि. २ डिसेंबर ते ९ डिसेंबर रोजी होणार असल्याचे नगरपंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सुचित केले उपस्थित माणगांवकर लोकप्रतिनीधी व नागरिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे अतिशय समर्पकतेने प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी निरसन केले. या निवडणुक आरक्षणाकडे नजर टाकल्यास माणगांव मध्ये पुन्हा एकदा महिलाराज कडे वाटचाल अशी चर्चा सुरु झाली आहे. जुण्या प्रभाग व आरक्षणा मुळे विद्यमान दिग्गज नगरसेवकांचे पुढील स्वप्न विरले असल्याचा सुर माणगांवात उमटला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies