कुंटणखाना चालविणाऱ्या टोळी प्रमुखांसह साथीदार गजाआड
कुलदीप मोहिते -कराड
सातारा शहरा च्या मध्यभागी वेश्याव्यवसाय करणारी तसेच पोलीस रेकॉर्ड वरील महिला सरिता बजरंग लाडी राहणार तोफखाना सातारा हिस सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे सदरच्या महिला आरोपीस माननीय न्यायालय यांनी 28 11 2020 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे याबाबत सातारा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की महिला आरोपी ही तिच्या साथीदारांसह सातारच्या मध्यभागी वेश्याव्यवसाय चालवत होती सदरच्या महिलेविरुद्ध व तिच्या साथीदारां विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात 19 11 2020 रोजी गुन्हा दाखल होता परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचे आरोपी हे फरार होते गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सह पो अधीक्षक आंचल दलाल सातारा विभाग यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री एन एस कदम यांना दिल्या अशातच 22 11 2020 रोजी पोलीस उपनिरीक्षक कदम व त्यांच्या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हे आपले अस्तित्व लपून पुणे येथे राहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मिळालेल्या माहितीची खात्री करून नियोजनबद्धरीत्या सापळा रचला व गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सरिता बजरंग लाडी हीच तिच्या राहत्या फ्लॅट वरून छापा टाकून ताब्यात घेतले व सातारा शहर पोलीस स्टेशन येथे आणून तिच्याकडून अन्य साथीदारांची माहिती घेऊन गुन्ह्यातील दुसरा आरोपी आकाश शनि कांबळे (दुर्गा पेठ )सातारा याला अटक करण्यात आले व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली
सदरची कारवाई ही सातारचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सहा पोलीस अधीक्षक आंचल दलाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली व ह्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक एन एस कदम सहा फौज विश्वास कडव पोलीस हवालदार 17 72 वाघमळे 648 शेवाळे पोना 1697 भिसे पो ना 587 चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल साबळे घाडगे कचरे धुमाळ व पोलीस कॉन्स्टेबल भोग यांनी सहभाग घेतला होता सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सह पोलीस अधीक्षक आंचल दलाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी अभिनंदन केले