एटीएम मध्ये कुणी पैसे टाकेल का ?
श्रीवर्धन, बोर्लीपंचतन, दिवेआगर मधील एटीएम मध्ये ठणठणाट, पर्यटक हैराण
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील स्टेट बँक एटीम,महाराष्ट्र बँकेचे एटीएम, महाड बँकेचे एटीएम तर दिवेआगर येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम,रायगड जिल्हा बँकेचे एटीएम असून या ठिकानाहून दिवेआगर,वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी पंचक्रोशी आदी गावांतील तर दिवेआगर येथे मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या एटीएम मशीन मधुन व्यवहार होतात. बँक ऑफ महाराष्ट्र,स्टेट बँक, रायगड जिल्हा मध्यवर्गीय बँक,महाड बँक तसेच पतपेठया शहरात असल्याने नेहमीच नागरिकांची धावपळ पाहायला मिळते.बोर्ली पंचतन शहरात तीन बँकेचे एटीएम आहेत. मात्र बहुतेक वेळी त्या तीनही मशीन शोभेच्या वस्तू बनतात. धावपळीच्या युगात रांगेत उभे राहून बॅंकेत पैसे काढण्यासाठी बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. त्यामुळे अशा ग्राहकांनी "एटीएम' सेवेचा वापर करण्यास सुरवात केली आहे. "नव्याचे नऊ दिवस' बँकेने चांगली सेवा दिली होती. परंतु कालांतराने बॅंकेच्या सेवेत त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे पेटोल पंपावरील बॅंकेंची "एटीएम' सेवा "असून अडचण नसून खोळंबा' अशीच झाली आहे.दिवेआगर, दिघी - जंजिरा पर्यटन स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची नेहमी वर्दळ या ठिकाणी असते. विशेष म्हणजे एटीएममध्ये सातत्याने पैसे नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांना ही त्रास होतो. कार्ड ज्या बँकेच्या आहे त्या एटीएम मध्ये पैसे नसल्यास आर्थिक भुर्दंड असताना देखील इतर बँकेच्या एटीएम चा वापर करतात. मात्र तिथेही रक्कम काढता येत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करतात. याकडे शेजारीच असलेले बँक अधिकारी हात वर करून मोकळे होतात.