Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पाटणच उपजिल्हा रुग्णालय होणार सुसज्ज १००खाटांचे

 

पाटणच उपजिल्हा रुग्णालय होणार सुसज्ज १००खाटांचे

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

हेमंत पाटील -पाटण


राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन येथे 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा दि.06 मार्च,2020 रोजी अर्थसंकल्प मांडताना केली होती. ना.शंभूराज देसाईंच्या पुढाकारामुळे राज्य शासनाच्या सार्वजनीक आरोग्य विभागाने पाटण,जि.सातारा येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन तेथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करणेबाबत मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय दि. 24 नोव्हेंबर, 2020 रोजी पारित केला असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय, पाटण असे ओळखले जाणार आहे.


             सन 2004 साली पहिल्यांदा पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेनंतर मतदारसंघाचे आमदार म्हणून शंभूराज देसाईंनी पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतर करुन या रुग्णालयामध्ये 100 खाटांचे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय होण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या या पाठपुराव्याला ते राज्याचे अर्थराज्यमंत्री झालेनंतर मुहुर्तस्वरुप प्राप्त झाले. राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प मांडताना “ घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी ” या म्हणीप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पातील काही वाटा आपल्या ग्रामीण आणि डोंगरी मतदारसंघाकरीता मिळावा याकरीता ते सातत्याने आग्रही राहिले आणि त्यांनी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन येथे 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची  घोषणाही केली. त्यांच्या घोषणेमुळे पाटण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या.विधानपरिषदेमध्ये  घोषणा करुन 15 दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याच्या अगोदरच ना. शंभूराज देसाईंनी पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात 100 खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्याकरीता कुठे जागा उपलब्ध आहे व कशाप्रकारे हे उपजिल्हा रुग्णालय उभे करता येईल याकरीता येथील परिसराची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी देखील केली होती.


                  पाटण, जि.सातारा येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन तेथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिल्याचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून  दि. 24 नोव्हेंबर,2020 रोजी पारित केला असल्यामुळे या कामांस गती प्राप्त झाली आहे.सदर रुग्णालयासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी अंदाज आराखडे तयार करुन प्रशासकीय मान्यता देण्याकरीता सादर करण्यात यावेत तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करावा असे शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे.


           पाटण मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम असुन मतदारसंघातील जनतेला आरोग्य सुविधा घेणेकरीता कराड किंवा सातारा येथील उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाकडे जावे लागत असल्याने ही आरोग्य सुविधा पाटण या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय करुन मतदारसंघातील जनतेला मिळवून दयावी याकरीता ना.शंभूराज देसाईंची सातत्याची तळमळ होती. त्यांच्या प्रयत्नातून पाटण ग्रामीण रुग्णालयाचे रुपातंर आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाले असून हे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे पाटण मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.पाटण ग्रामीण रुग्णालयाची ओळख उपजिल्हा रुग्णालय, पाटण अशी निर्माण करणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना त्यांनी घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे मतदारसंघातील जनतेने धन्यवाद व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies