Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रस्ता नसल्याने उपचारा अभावी मातेचा व नवजात अर्भकाचा मृत्यु

 रस्ता नसल्याने उपचारा अभावी मातेचा व नवजात अर्भकाचा मृत्यु
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुर्दैवी घटना



निरंजन पाटील-
महाराष्ट्र मिरर टीम कोल्हापूर


राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा  येथे प्रसुतीवेळी २६ वर्षीय महिलेचा व नवजात अर्भकाचा मृत्यु झाला . या धनगरवाड्याला रस्ताच नसलेने संबंधित महिलेवर  वेळीच वैद्यकिय उपचार न झाल्यामुळे बाळ व मातेला जिव गमवावा लागला .

म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा पादुकाचा धनगरवाडा व रातंबिचा धनगरवाडा हे धनगरवाडे मुख्य रस्त्या पासुन सुमारे सात कि मी डोंगरात वसलेले आहेत . येथे ये जा करण्यासाठी कुठलाही रस्ता नसुन फक्त पायवाट आहे . त्यामुळे येथील अत्यवस्थ अबाल वृद्धांसह नागरिकांना काट्याकुट्याच्या  पायवाटेतुन बाजल्यावरून उपचारासाठी नेण्यात येते . 



बुधवारी रात्री २ वाजता येथील भागुबाई राजु घुरके या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या . संबंधित महिलेला तेथील लोकांनी बाजल्यावरुन पक्क्या रस्त्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला . पण वाटेतच प्रसुती होणार असलेने त्यांनी त्या महिलेला पुन्हा घरी नेले . व तीची प्रसुती झाली . दरम्यान धामोड प्रा आ केंद्रामधुन वैद्यकिय पथक तेथे पोहचले . पण त्याआधीच त्या मातेचा व बाळाचा मृत्यु झाला .  

पक्का रस्ता नसलेने वर्षभरात या धनगरवाड्या वरिल माता व बालका सह चार लोकांना आपला जिव गमवावा लागला असुन प्रशासन आणखीन किती बळी घेणार असा सवाल धनगर समाजाकडून होत आहे 

   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies