Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ “संकल्पपॅथी”: २१व्या शतकाची वैद्यकीय गरज

एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ “संकल्पपॅथी”: २१व्या शतकाची वैद्यकीय गरज

तरोनिश मेहता-पुणेकोणत्याही पॅथीला विरोध न करता प्रत्येक पॅथीची खास वैशिष्ठ्ये तसेच त्याची मर्यादा लक्षात घेउन ‘एकात्मिक वैद्यकीय प्रणाली’ म्हणजे (Ideal Integrated Medical Model) वापरता येऊ शकतो, याचे प्रॅक्टीकल उदाहरण म्हणजे ‘संकल्पपॅथी’. संकल्पपॅथी ही एक विचारप्रणाली आहे जेथे प्रत्येक पॅथीने हातात हात देऊन, एकमेकांना समजून घेऊन जर ती वापरण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पॅथीतील कार्यकुशलतेचा फायदा रुग्णांना नक्कीच होऊ शकतो. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार आणि मानवी मानसशास्त्र यांचे एकत्रिकरण करण्याचा हा आग्रही प्रयत्न असून ही एकात्मिक वैद्यकीय प्रणाली आहे. आज देशामध्ये या घडीला वैद्यकिय क्षेत्राला ‘संकल्पपॅथी’ची गरज असल्याचे मत वैद्यकिय क्षेत्रात गेली तीस वर्षे काम करत असलेले डॉक्टर, माजी वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी आणि ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एन. कदम (M.B.B.S., MS(Psy)) यांनी व्यक्त केले.वैद्यकीय क्षेत्रातील पॅथींबाबतचा वाद याविषयीच्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत डॉ. पी.एन. कदम होते. यावेळी ‘संकल्प' संस्थेच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव, डॉ. मनिषा कदम, संशोधन आणि विकास विभाग प्रमुख शर्वरी डोंबे, डॉ. प्रचिती पुंडे, माजी प्राचार्य प्रा. सुभाष पतके यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन, स्वागत आणि आभार डॉ. प्रचिती पुंडे यांनी मानले.


संकल्पपॅथी हि अ‍ॅलोपॅथी  किंवा होमिओपॅथी अशा सारखी  केवळ एक विशिष्ट औषधोपचार  शिकवणारी पद्धती सुचवणारी पॅथी नसून एक एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचे तत्वज्ञान आहे. 21 व्या शतकात केवळ लाक्षणिक उपचार हा उद्देश ठेऊन काम वैद्यकीय सेवा करण्यापेक्षा व्यक्तीच्या जीवनशैलीचा अभ्यास मनोकायिक आजारांचा अभ्यास थोडक्यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्थितीचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच संकल्पने एकात्मिक वैद्यकीय प्रणालीचा स्वीकार करून ज्या त्या विषयातील तज्ञांने त्याच्या दृष्टिकोनातून निदान आणि योग्य उपचार सुचवावे मात्र हे करत असताना आपल्या पॅथीच्या मर्यादा आणि निश्चितता याची त्याला जाणीव असावी असे वक्तव्य डॉ.कदम यांनी व्यक्त केले.


प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषध या दोन्हींच्या विकसनशील आवश्यकतांचे विश्लेषण केल्यावर मी असा निष्कर्ष काढला आहे की, कोणत्याही तथाकथित उपचार जे अवयवाचे सामान्य शरीरविज्ञान परत आणण्यास असमर्थ असतात ते केवळ तात्पुरते आहे. प्रत्येक भारतीयांप्रमाणेच मला आयुष्यातील आयुर्वेदिक विज्ञानावर, चांगल्या आरोग्यासाठी मनावर आणि शरीरावर लक्ष केंद्रित करणारी आपली वेळ-मानित देशी औषध प्रणालीवर विश्वास आहे. त्यात भर म्हणून होमिओपॅथी आणि निसर्गोपचार, तसेच आधुनिक काळातील मानसशास्त्रीय साधने यांचे आंतरिक शहाणपण आणि आपल्याकडे एक समाकलित प्रणाली आहे जी मानवी शरीरावर वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते.


डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या कि, निदान होत नाही?, निदान झालेय पण उपचारांबद्दल संदिग्धता, कन्फ्युजन, कित्येक दिवस / महिने उपचार सुरु आहेत पण प्रतिसाद अत्यल्प किंवा नाहीच अशावेळी ‘संकल्प’. आजाराच्या मुळाशी कसं जायचं आणि मुळापासून आजारांना बरं कसं करायचं हे संकल्पचे वैशिष्ठ्ये आहे. आहार, विहार आणि विचार या त्रिसुत्रिंबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील अभिनव प्रयोग म्हणजेच संकल्प एम.एन.टी. (MNT) मेडीकल न्युट्रीशन थेरपी. डेंगूपासुन ते अप्लॅस्टीक अ‍ॅनिमियापर्यंत आणि पित्तापासून ह्र्दयापर्यंत पेशींचे पोषन आणि बॉडी पीएच नॉर्मल करण्यासाठी २१व्या शतकातील ‘संकल्पपॅथी’ हा नवा अध्याय लिहिण्यास सिद्ध आहे.


शर्वरी डोंबे म्हणाल्या कि, वैद्यकीय क्षेत्र खूप झपाट्याने बदलत आहे. निदान करण्याच्या नवनवीन मशीन्स आणि लॅबोरेटरी टेस्ट येत असल्यातरी उपचारांमध्ये फार फरक पडलेला दिसत नाही. 2020 हे वर्ष वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणारे आहे. अनेक अ‍ॅंटीबायोटिक्स हे अक्षरश: रिटायर होत असतानाच नेहमीच्या वापरातील अनेक औषधे बॅन्ड मेडिसिन होतील. स्टॅटीन, निमेसुलाईड आणि नुकतेच धोकादायक म्हणून जाहीर झालेली पित्तशामक रॅनीटीडीन (Ranitidine), रॅबीप्रॅझॉल (Rabiprazole), पॅन्टोप्रॅझॉल (Pantoprazole) ही तर फक्त सुरुवात आहे. वर्षानुवर्षे एकाच चाकोरीतून उपचार करणारी आयुर्वेद आणि होमिओपॅथी तसेच सतत नवनवीन इव्हीडन्स बेस्ड औषधांचा शोध लागूनही प्रचंड इयाट्रोजेनिक कॉम्प्लिकेशन्स (Iatrogenic Complications) आणि मॉडर्न मेडीसीनच्या मर्यादा समोर येत आहेत. नेमकं कोणत्या डॉक्टरांवर विश्वास ठेवावा हा विचार करत असताना आणि स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेधालिस्टच्या रेफरलमुळे कन्फ्यूज झालेल्या वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा देणारा प्रयोग म्हणजे ‘संकल्पपॅथी’माजी प्राचार्य प्रा. सुभाष पतके म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वैद्यकिय क्षेत्रातील वाद आज गंभीर चर्चेत  आहेत. अनेक पॅथी आपण किती श्रेष्ठ आहोत, आपले वर्चस्व किती महत्वाचे आहे हे सिद्ध करत आहेत. त्यातून वाद घडत आहेत. होमिओपॅथी, आयुर्वेदाचे डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत वैगेरे गोष्टी सतत चर्चेत आहेत. त्याचबरोबर सर्व पॅथी एकत्र करुन मिक्सोपॅथी करण्याची मागणी होत आहे. मात्र ‘मिक्सोपॅथी’ची मागणी हि चुकीची आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies