31 डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
मिलिंद लोहार -पुणे
कोवीड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करुन शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली असल्याने त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांच्याकडील आदेशान्वये राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि. 5 जानेवारी, 2021 पर्यंत रात्री 11 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहे, असेही डॉ.देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.