Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

No title

 तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतमध्ये शेवटच्या दिवशी 823 अर्ज दाखल. नरसेवाडी बिनविरोध.तर लोकरेवाडी बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

राजू थोरात- तासगाव 



तासगाव तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काट्याची टक्कर होणार हे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील नरसेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती ती ग्रामपंचायत नरसेवाडी ग्रामस्थांनी बिनविरोध केली.तर लोकरेवाडी ग्रामपंचायत मध्ये 1 अर्ज जादा भरल्यामुळे बिनविरोध झाली नाही. लोकरेवाडी ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात होती. अर्ज माघारी घेण्याचा दिवशी एक अर्ज मागे घेतल्यानंतर लोकरेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध होणार आहे.



निवडणुकीसाठी ऑनलाइन आग्रह सोडून ऑफलाइन फॉर्म भरण्याची परवानगी राज्य सरकारने आदेश दिल्यामुळे दी 30 रोजी सायंकाळी 5-30 पर्यत मुदत होती. निवडणूक हॉलचे 5-30 नंतर मुख्य प्रवेशद्वार बंद केली.आत मध्ये संध्याकाळी 7-30 पर्यत उमेदवारांनी निवडणुकीसाठी आपले अर्ज भरले.

     ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा ठिकाणी कोलमडली होती. त्यामुळे उमेदवारांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत होता.राज्यसरकारने एक दिवस ऑनलाइन अर्ज घ्या असे आदेश जारी केले. तासगाव तालुक्यामध्ये कवठेएकंद, सावळज,पेड,विसापूर,माजंर्डे,

येळावी, ही गावे पोलिसांनी हाय अलर्ट जारी केली आहेत.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दी 30 रोजी 39 ग्रामपंचायत मध्ये एकूण आळते 22,बोरगाव 38, ढवळी 32, हातनोली 7, जुळेवाडी15, कवठे एकंद 47, धामणी 6, निंबळक 13, राजापूर 42, शिरगाव27, तूरची 52, विसापूर 31, येळावी 30, धोंडेवाडी 2, धुळगाव 9, डोरली 12, गोटेवाडी 31, हातनुर 39, कौलगे 17, लोढे 18, मांजर्डे 18, मोराळे 12, नागाव 20, नरसेवाडी 0,पाडळी 14, विजयनगर 17, दहिवडी 14, डोंगरसोनी 28, गौरगाव 15, गव्हाण 20, जरंडी 12, लोकरेवाडी 3, पेड 33, सावळज 51, सिद्धेवाडी 15 वज्रचौंडे 18 वडगाव 26 वाघापूर 16 यमगरवाडी 1 असे एकूण 823 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे.

नरसेवाडी बिनविरोध झाल्यामुळे 38 ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांनी अर्ज भरपूर भरले आहेत. तर लोकरेवाडी येथे 1 अर्ज जादा असल्याने बिनविरोध होऊ शकली नाही.



अर्ज भरताना तहसिल कार्यालय आवारात गर्दी खूप झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व इतर पोलिस व होमगार्ड यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून गर्दी कमी केली.

तर निवडणूक शाखेमध्ये काही उमेदवारांनी काही अधिकारी यांच्याबरोबर हुज्जत घातली.

अर्ज छाननी   31 तारखेला आहे. तर अर्ज मागे मुदत 4 जानेवारीला 3  वाजेपर्यंत आहे. उद्या 31तारखेला किती अर्ज छानणी मध्ये किती बाद होतात ते 3 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. तर 4 जानेवारी 3 वाजेपर्यंत कोण कोण अर्ज मागे घेते ते पहावे लागेल.
विसापूर ह्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी भाजप शिवसेना आरपीआय एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विसापूर मध्ये अपक्षांनी अर्ज जास्त भरले आहेत. स्थानिक नेते आता अपेक्षांची मनधरणी कशी करणार हे पहावे लागेल.


आमदार-खासदारांनी बिनविरोध ग्रामपंचायत होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे स्थानिक नेते बोलून दाखवत आहेत.

राज्यामध्ये काही आमदार व खासदारांनी बिनविरोध ग्रामपंचायती करणार त्या ठिकाणी स्वतःच्या फंडातून 10 लाख ते 30 लाख निधी जाहीर केला. पण भाजपचे खासदार संजयकाका पाटील व राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी बिनविरोध निवडणुका करण्यासाठी कोणत्याही गावाला निधी जाहीर केला नाही.

 निधी जाहीर जर केला असता तर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असत्या असे स्थानिक नेते बोलून दाखवत आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies