Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार

महात्मा फुले युवा दलाच्या मागणीला यश
- अ‍ॅड.धंनजय फरांदे

प्रतिक मिसाळ-सातारास्त्रियांना चुल व मुल या बंधनातून मुक्त करुन शिक्षणाची दारं उघडी करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी होणार आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

महात्मा फुले युवा दल अनेक वर्षापासुन महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अ‍ॅड. सतिषजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी करत होते. आज मागणीला यश आल्याच्या भावना अ‍ॅड.धंनजय फरांदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, बालविवाह तसेच अनेक वाईट प्रथांविरोधात आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा लढा जोमाने पुढे नेले. तथाकथित धर्ममार्तंडांचा विरोध झुगारून त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं. त्यामुळे सामाजिक उतरंडीत उपेक्षित असलेली स्त्री शिक्षण शिकून शहाणी झाली, ज्ञानसंपन्न झाली. आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना पुरुषांच्या पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करीत आहेत. ज्या सवित्रीबाईंमुळे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला, त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी व्हावी, अशी मागणी महात्मा फुले युवा दलाची होती. गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला याबाबत युवा दलाच्या वतीने पाठपुरावा सुरू होता. अखेर या मागणीला यश आले असून राज्य शासनाच्या वतीने 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले जयंती दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले युवा दल, सातारा जिल्हा प्रमुख अ‍ॅड.धंनजय फरांदे यांनी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies