Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीचे उत्पादन सुरु करा --आ.शिवेंद्रसिंहराजे

महाराष्ट्र स्कुटर्समध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीचे उत्पादन सुरु करा --आ.शिवेंद्रसिंहराजे

राजीव बजाज यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

प्रतीक मिसाळ-सातारा


सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे . सुमारे ४५ एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मीती झाली होती मात्र या कंपनीचे कामकाज सध्या बंद अवस्थेत आहे . साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगार निर्मीतीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्यक आहे . बजाज उद्योग समुहामार्फत इथेनॉलवर चालणारी दुचाकी निर्मीती करण्यात येत असल्याचे समजले आहे . ही बाब आनंददायी आणि स्वागतार्ह असून इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकीचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लांटमध्ये सुरु केल्यास पुन्हा ही कंपनी पुर्ण क्षमतेने सुरु होईल . बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांचा रोजगारनिर्मीतीचा उद्देशही सफल होईल . त्यामुळे याबाबत बजाज उद्योग समुहाने सकारात्मक विचार करुन दुचाकी निर्मीतीद्वारे साताऱ्यातील प्लांट पुन्हा सुरु करावा , अशी मागणी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजीव बजाज यांच्याकडे केली आहे . याबाबत आ शिवेंद्रसिंहराजे यांनी बजाज यांना निवदेन दिले आहे . साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान- मोठे उद्योग सध्या बंद आहेत . यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे . ही कंपनी पुन्हा सुरु झाल्यास त्यावर अवलंबून असणारे लहान मोठे उद्योग सुरु झाल्यास साताऱ्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधीत उद्योगाशी निगडीत कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे . कंपनी पुन्हा सुरु झाल्यास सातारा येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे . आपल्या उद्योग समुहाने इथेनॉलवर चालणाऱ्यादुचाकी निर्मीतीची सुरुवात केल्याचे समजले त्यामुळेच सातारा येथील प्लांटमध्ये या दुचाकीचे उत्पादन घेण्यासाठी कंपनी पुन्हा सुरु करावी असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात म्हटले आहे . सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने इथेनॉलची निर्मीती करत आहेत . पर्यायाने शेतकऱ्यानाही ऊसदर चांगला मिळत आहे . सातारा औद्योगिक वसाहतीतील एक नामांकित आणि प्रथितयश कंपनी म्हणून महाराष्ट्र स्कुटर्सचा नावलौकिक आहे . साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्ता प्राप्त होण्यासाठी ही कंपनी सुरु होणे अत्यावश्यक आहे . त्यामुळे याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि सातारा येथील प्लांट पुन्हा सुरु करावा , असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies