शेतकरी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत म्हसळा शहरात कडकडीत बंद.
अरुण जंगम-म्हसळा
केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याकरिता देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला व 8 डिसेंबर 2020 रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्याकरता म्हसळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी असोशियन, भाजी विक्रेते तसेच छोट्या-मोठ्या स्टॉल धारकांनी या बंद मध्ये सहभाग घेतला. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये दवाखाने, औषध आणि दूध विक्रेते ही दुकाने तळा शहरात सुरू ठेवण्यात आली होती. दिल्लीत पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शेतकरी संघटना आणि सरकार यांच्या तील चर्चा निष्फळ ठरल्या कारणाने हे आंदोलन पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तरी सर्व शेतकरी संघटनांकडून देशातील जनतेला या बंदला पाठिंबा देऊन हा बंद यशस्वी करण्याचे आव्हान करण्यात आले होते. आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवल्याचे पहावयास मिळत आहे.
एसटी सेवा मात्र सुरळीतपणे सुरु असुन कोणताही अनुचीत प्रकार घडु नये याकरीता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.