माणगाव येथील श्री क्षेत्र चापडी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
परमपुज्य सद्गुरुनाथ काका महाराज (श्रीपाद अनंत वैद्य) यांच्या सेवा परिवाराच्या माध्यमातून प.पु. सद्गुरुनाथ श्री.काका महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवासाच्या औचित्याने माणगाव येथील श्रीक्षेत्र चापडी येथे शनिवार दि.५ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये पुणे येथिल डॉ.सौ.आश्विनी बुधे व डॉ.प्रल्हाद शिंदे यांनी आपले योगदान देउन १५७ महीला,पुरुष व बालकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्याचबरोबर न्यासातर्फे त्यांना विविध आजारांंवरील मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
सद्गुरुनाथ श्री काका महाराज १९७५ सालापासून जनकल्याणाचे कार्य अविरत,अखंडपणे करीत आहेत.श्री काका महाराजांकडे मार्गदर्शनासाठी येणाऱ्या लोकांना ईश्वरभक्तीची आवड लागावी यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या वास्तूतील परिसरात भक्तांच्या सुख-सुविधेसाठी २००८ साली ’मुरलीधर वास’ हे प्रशस्त सत्संगालय स्वखर्चाने बांधले. न्यासाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा व संजीवक विचारधारेचा प्रचार व प्रसाराबरोबरच गरीब व वंचित लोकांना मदत करणे गरजू लोकांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवणे, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे,जनजागृती करणे इत्यादी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.आपल्या भक्तांनी नामसाधनेच्या मार्गाने आत्मनिर्भर होऊन जीवनात आनंदी व निर्भीड व्हावं यासाठी मंदिरात सत्संगाचा उपक्रमही सुरु केला.प.पू.श्री काका महाराजांचे भक्त/अनुयायी ते करीत असलेल्या लोककल्याणाच्या समान धाग्यानीच एकत्र आलेले आहेत.
सदर आरोग्य तपासणी शिबिर संपन्न करण्यासाठी न्यासाचे अध्यक्ष श्री.अजित बग्गा,उणेगाव गृप ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.शिंदे,तसेच न्यासाचे विश्वस्थ,सेवेकरी व ग्रामस्थांचे अमुल्य योगदान लाभले.