भारत बंदला पाटणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.....
हेमंत पाटील -पाटण
केंद्र सरकारनं केलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करत भारत बंदची हाक देण्यात आली आहे.. या बंदला पाटणमध्ये व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.. शहरातील दुकाने पूर्णतः बंद दिसली मात्र शहराच्या बाहेरील दुकाने पूर्णपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले त्याचबरोबर पाटण कराड चिपळूण देखील 50 टक्क्यापेक्षा जास्त सुरू असलेला दिसून आला सकाळपासून महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली
शेतकरी संघटना तसेच महाविकास आघाडी सरकारनंया बंदला पाठींबा दिला आहे.. शहरातील दुकाने उघडण्यात आली नाहीयेत.. यामुळं पाटण अंतर्गत व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत आहे
.