पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात

 पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेस सुरवात

मिलिंद लोहार-पुणे


पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे.  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.

कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्‍क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्‍ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्‍यात आले आहे. 

मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेच्‍या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघाच्‍या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदार संघात एकूण मतदार 4 लाख 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.


            पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे आहे. 

*पुणे जिल्हा - पुरुष  89 हजार 626, स्‍त्री 46 हजार 958, इतर 27 (एकूण 1 लक्ष 36 हजार 611), 

*सातारा जिल्‍हा -  पुरुष 39 हजार 397, स्‍त्री 19 हजार 673, इतर 1  (एकूण 59 हजार 71 ), 

*सांगली जिल्हा- पुरुष  57 हजार 569, स्‍त्री 29 हजार 661, इतर 3  (एकूण 87 हजार 233), 

*कोल्‍हापूर जिल्हा- पुरुष 62 हजार 709 , स्‍त्री 26हजार 820, इतर 0  (एकूण 89 हजार 529) 

* सोलापूर जिल्‍हा - पुरुष  41हजार 70, स्‍त्री 11 हजार 742, इतर 1  (एकूण  53  हजार 813).


             शिक्षक मतदार संघातील मतदारांची संख्‍या जिल्‍हानिहाय पुढीलप्रमाणे- 

*पुणे जिल्हा- पुरुष  15 हजार 807, स्‍त्री 16हजार 371, इतर 23  (एकूण 32 हजार 201), 

*सातारा जिल्‍हा - पुरुष  5 हजार 121, स्‍त्री  2 हजार 589 , इतर 1  (एकूण 7 हजार 711), 

*सांगली जिल्हा - पुरुष  4 हजार 826, स्‍त्री 1 हजार 985, इतर 1   (एकूण 6 हजार 812 ), 

*कोल्‍हापूर जिल्हा- पुरुष  8हजार 878, स्‍त्री 3हजार 359,  इतर 0  (एकूण 12हजार 237) 

*सोलापूर जिल्‍हा - पुरुष  10 हजार 561, स्‍त्री  3 हजार 23, इतर 0  (एकूण 13हजार 584).

             मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदार संघासाठी 18 हॉल तर शिक्षक मतदार संघासाठी 6 हॉल आहेत.  त्‍यानुसार स्‍वतंत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, रो (रांग) अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक हॉलमध्‍ये 7 टेबल आहेत.  त्‍याप्रमाणे पदवीधरसाठी 126 पर्यवेक्षक, 252 सहायक व 126  शिपाई आणि शिक्षक मतदारसंघासाठी 42 पर्यवेक्षक 84 सहायक आणि 42 शिपायांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.  पदवीधरसाठी (राखीवसह) एकूण 855 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 305 अधिकारी-कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. सुरक्षेसाठी 450 पोलीस अधिकारी-कर्मचारी उपलब्‍ध आहेत.  

     

No comments:

Post a Comment